बारावीत जिल्ह्याचा निकाल सरासरी 95.32 टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2022 05:00 AM2022-06-09T05:00:00+5:302022-06-09T05:00:19+5:30

दोन वर्षाच्या कोरोनाकाळानंतर यावर्षी विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाईन झाली होती. त्यामुळे निकालाची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी १३ हजार २७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १३ हजार ७४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून १२ हजार ४६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ६११ विद्यार्थ्यांना यश मिळाले नाही. 

Twelfth district average 95.32 percent | बारावीत जिल्ह्याचा निकाल सरासरी 95.32 टक्के

बारावीत जिल्ह्याचा निकाल सरासरी 95.32 टक्के

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील ‘ टर्निंग पॉईंट ’ असणाऱ्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केला. यात गडचिरोली जिल्ह्याचा सरासरी निकाल ९५.३२ टक्के लागला आहे. नागपूर मंडळातील सहा जिल्ह्यांमध्ये हा निकाल सर्वात कमी आहे. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या श्याम सुधीर झंजाळ या विद्यार्थ्याने ९६.६७ टक्के घेऊन जिल्ह्यातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. गडचिरोलीच्या शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या समीक्षा योगेंद्र धानोरकर हिने ९२.६७ टक्के गुण घेऊन मुलींमधून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या चिराग जयदेव सोरते याने ९४.६७ टक्के गुण मिळवून जिल्ह्यात दुसरा येण्याचा बहुमान पटकावला, तर याच शाळेचा प्रतीक प्रकाश मंडल हा ९४ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात गुणानुक्रमे तिसरा आला आहे.
दोन वर्षाच्या कोरोनाकाळानंतर यावर्षी विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाईन झाली होती. त्यामुळे निकालाची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी १३ हजार २७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १३ हजार ७४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून १२ हजार ४६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ६११ विद्यार्थ्यांना यश मिळाले नाही. 

६२ शाळांचा निकाल १०० टक्के
-    जिल्ह्यातील एकूण शाळांपैकी ६२ शाळांचा निकाल यावर्षी १०० टक्के राहिला. त्यात १० शासकीय आश्रमशाळांचा ही समावेश आहे. यावर्षी विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाईन असली तरी त्यांची शाळाच त्यांचे परीक्षा केंद्र होते. त्याचाही परिणाम निकालावर लागला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे सर्वात कमी टक्के म्हणजे २२.२२ टक्के निकाल एका शाळेचा लागला आहे.

श्याम म्हणतो, आयएएस व्हायचंय
जिल्ह्यात सर्वप्रथम आलेल्या श्याम झंजाळ याला आधी डॉक्टर बनून नंतर आयएएसची तयारी करायची आहे. त्याला कोणतीही ट्युशन नव्हती. शाळेच्या व्यतिरिक्त तो घरी ६ ते ७ तास दररोज अभ्यास करायचा. याशिवाय त्याला खेळाची ही आवड असून तो क्रिकेट आणि स्वीमिंगला ही जातो. गिरोला येथील आश्रमशाळेवर शिक्षक असलेले त्याचे वडील, गृहिणी असलेली आई, आजी-आजोबांचे त्याला सतत प्रोत्साहन मिळत असल्याचे त्याने सांगितले.

निकालात मुली माघारल्या
विशेष म्हणजे दरवर्षी गुणवत्तेत आणि एकूण निकालात मुलांच्या तुलनेत मुलीच आघाडीवर असतात. पण यावर्षी मुलांनी बाजी मारली. गुणवत्तेत जिल्ह्यातून आघाडीवर मुलेच आहेत. याशिवाय उत्तीर्ण विद्यार्थ्यात ही मुलांचे प्रमाण जास्त आहे. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे स्वामी विवेकानंद या एकाच शाळेच्या तीन विद्यार्थ्यांनी जिल्ह्यात सर्वाधिक गुण घेतले आहेत. काही शाळांनी सीबीएसई बोर्ड लागू केल्याने इतर शाळांना गुणवत्ता दाखविण्याची संधी मिळाली. काेराेना संकटामुळे मागील दाेन्ही परीक्षा ऑनलाईन पार पडल्या हाेत्या. दाेन वर्षानंतर यंदा ऑफलाईन परीक्षा झाली. शाळांचा निकाल फुगला आहे. 

 

Web Title: Twelfth district average 95.32 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.