वडधात १२ जोडपी विवाहबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 01:15 AM2018-04-16T01:15:47+5:302018-04-16T01:15:47+5:30

आरमोरी तालुक्यातील वडधा येथे तेली समाज मंडळ वडधा यांच्या पुढाकारातून सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन १५ एप्रिल रोजी करण्यात आले होते. या विवाह सोहळ्यात १२ जोडपी विवाहबध्द झाली.

Twelve married couples in marriage | वडधात १२ जोडपी विवाहबद्ध

वडधात १२ जोडपी विवाहबद्ध

Next
ठळक मुद्देसामाजिक उपक्रम : तेली समाज मंडळाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
वडधा : आरमोरी तालुक्यातील वडधा येथे तेली समाज मंडळ वडधा यांच्या पुढाकारातून सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन १५ एप्रिल रोजी करण्यात आले होते. या विवाह सोहळ्यात १२ जोडपी विवाहबध्द झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वडधा ग्रामपंचायतीच्या सरपंच अर्चना कोलते होत्या. विवाह सोहळ्याचे उद्घाटन विदर्भ तेली समाज मंडळ नागपूरचे अध्यक्ष प्रशांत कांबळे होते. प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बळवंत लाकडे, जिल्हा परिषद सदस्य जगन्नाथ बोरकुटे, देवेंद्र कैकाडे, रामोजी सहारे, रमेशपंथ नागोसे, नगरसेविका रितू कोलते, नरेंद्र भरडकर, भाष्कर ठाकरे, भाग्यवान खोब्रागडे, पोलीस पाटील लालाजी दुधबळे, जीवन कोलते, भुपेश कोलते, नारायण कोलते, माजी सभापती विठ्ठलराव निकुरे, कल्पना खानपुरे आदी मान्यवर उपस्थित होते. संचालन रोशनी राकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
तेली समाज मंडळाच्या वतीने मागील वर्षीपासून सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. मागील वर्षी १० जोडपी विवाहबध्द झाली तर यावर्षी सुमारे १२ जोडपी विवाहबध्द झाली. या विवाह सोहळ्यात वडधा परिसरातील तसेच गडचिरोली जिल्ह्यातील जोडपे विवाहबध्द झाले. सुमारे १४ हजार पेक्षा अधिक वऱ्हाडी विवाह सोहळ्याला उपस्थित होते. वऱ्हाड्यांच्या गर्दीमुळे वडधा गावाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. लग्नाचा संपूर्ण खर्च उचलण्याबरोबरच नवविवाहित जोडप्यांना भेटवस्तू सुध्दा देण्यात आली.
या सामूहिक विवाह सोहळ्याप्रसंगी मार्गदर्शन करताना उपस्थित मान्यवरांनी तेली समाज मंडळाच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. आजच्या वाढत्या महागाईमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम करणे अत्यंत आवश्यक आहे. लग्नाच्या ओझ्यामुळे मुलीच्या वडिलाला आत्महत्या करण्याची वेळ येते. सामुहिक विवाह सोहळा हा विवाहाचा अत्यंत चांगला उपक्रम आहे. त्यामुळे जास्तीत जास्त जोडप्यांनी सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी व्हावे. इतरही गावे व समाजाने या विवाह सोहळ्यात आदर्श घ्यावा, असे मार्गदर्शन उपस्थित मान्यवरांनी केले.

Web Title: Twelve married couples in marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न