अडीच कोटी आले, जागा मिळेना!

By admin | Published: November 3, 2014 11:24 PM2014-11-03T23:24:46+5:302014-11-03T23:24:46+5:30

नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची सुविधा निर्माण व्हावी, या हेतुने शासनाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांतर्गत अडीच वर्षांपूर्वी गडचिरोली येथे

Two and a half million came, get the place! | अडीच कोटी आले, जागा मिळेना!

अडीच कोटी आले, जागा मिळेना!

Next

मॉडेल कॉलेजची व्यथा : भाड्याच्या जागेवर दोन खोल्यांमध्ये सुरू आहे अध्यापनाचे काम
दिलीप दहेलकर - गडचिरोली
नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची सुविधा निर्माण व्हावी, या हेतुने शासनाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांतर्गत अडीच वर्षांपूर्वी गडचिरोली येथे मॉडेल कॉलेज सुरू केले. सुरूवातीला रातूम नागपूर विद्यापीठांतर्गत असलेल्या उपकेंद्राच्या इमारतीमध्ये सदर मॉडेल कॉलेज सुरू करण्यात आले. या मॉडेल कॉलेजच्या इमारतीच्या बांधकामासाठी रातूम विद्यापीठाला शासनाकडून अडीच कोटी रूपयाचा निधी दोन वर्षांपूर्वी प्राप्त झाला आहे. मात्र जागेअभावी सदर मॉडेल कॉलेजच्या इमारतीचे बांधकाम रखडले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी शासनाने २०११ मध्ये गडचिरोली येथे मॉडेल कॉलेजला मान्यता प्रदान केली. त्यानंतर १ जुलै २०११ रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या इमारतीत सदर मॉडेल कॉलेज सुरू करण्यात आले. मॉडेल कॉलेज सुरू झाल्यानंतर पहिल्या वर्षी बी.ए., बी.कॉम, बी.बी.ए. आदी अभ्यासक्रमाचे वर्ग सुरू करण्यात आले. दुसऱ्या वर्षी या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थी पटसंख्येत वाढ झाली. सन २०१३-१४ गोंडवाना विद्यापीठ प्रशासनाकडून रातूम नागपूर विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या इमारतीत असलेल्या मॉडेल कॉलेजला कुलूप ठोकण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सदर मॉडेल कॉलेज बंद झाल्याचा संदेश जाऊन यंदा या मॉडेल कॉलेजमध्ये फार कमी प्रवेश झाले असल्याची माहिती आहे. त्यानंतर एकाच खोलीमध्ये सदर मॉडेल कॉलेज सुरू होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या प्रशासनात सदर मॉडेल कॉलेजच्या मालकी हक्कावरून गेल्या दोन-तीन वर्षांपासून शीतयुध्द सुरू आहे. सद्यस्थितीत मॉडेल कॉलेज आरमोरी मार्गावर गोगावनजीक असलेल्या खासगी शिक्षण संस्थेच्या इमारतीत भाडे तत्वावर सुरू आहे.
बरेच प्रयत्न करूनही मॉडेल कॉलेज हस्तांतरित करण्यात गोंडवाना विद्यापीठ प्रशासनाला अपयश आले. मॉडेल कॉलेजच्या इमारतीच्या बांधकामासाठी आठ कोटी रूपयांची तरतूद शासनाने केली आहे. यापैकी इमारत बांधकामासाठी रातूम विद्यापीठाला अडीच कोटी रूपये मिळाले आहेत.
जागा शोधण्याच्या हालचालीला गती
शासनाने सर्व सोयीसुविधायुक्त प्रशस्त मॉडेल कॉलेजची संकल्पना गडचिरोली येथे साकार करण्याचे नियोजन केले. या कॉलेजमध्ये मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान, शौचालय, वाहनतळ, उपाहारगृह आदींचा समावेश नियोजनात आहे. सदर मॉडेल कॉलेजला प्रत्यक्षात साकार करण्यासाठी शासनाने या कॉलेजसाठी आठ कोटी रूपयाची तरतूद केली. यापैकी अडीच कोटी रूपयांचा निधी रातूम नागपूर विद्यापीठाला अडीच वर्षांपूर्वी दिला आहे. जिल्हाधिकारी रणजितकुमार यांच्याकडे गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू पद आल्यावर त्यांनी स्वत: या कॉलेजचे स्वतंत्र अस्तित्व राहावे यासाठी पुढाकार घेतला. काही दिवसांपूर्वी खरपुंडी गावानजीकच्या सहा एकर जागेची मॉडेल कॉलेजच्या इमारतीसाठी पाहणी केली होती. प्रशासनाकडून जागा शोधण्याच्या हालचालीला गती आली आहे.

Web Title: Two and a half million came, get the place!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.