अडीच हजार नागरिकांची होणार आरोग्य तपासणी
By Admin | Published: January 3, 2016 02:02 AM2016-01-03T02:02:16+5:302016-01-03T02:02:16+5:30
गडचिरोली जिल्हा जंगल कामगार सहकारी संघ व जंकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने १० टक्के कल्याणकारी ....
मारोतराव कोवासे यांची माहिती : जंकासतर्फे बुधवारी आरोग्य शिबिर
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा जंगल कामगार सहकारी संघ व जंकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने १० टक्के कल्याणकारी अधिदानातून ६ जानेवारी रोजी बुधवारला चामोर्शी मार्गावरील जंकास कार्यालयाच्या प्रांगणात नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात संस्थेंतर्गत गावातील तसेच शहरातील अडीच हजार नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती जंकासचे अध्यक्ष माजी खासदार मारोतराव कोवासे यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन जनमंच संस्था नागपूरचे अध्यक्ष अॅड. अनिल किलोर यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग राहणार आहेत. यावेळी विशेष अतिथी म्हणून जिल्हाधिकारी रणजितकुमार, मुख्य वनसंरक्षक पी. कल्याणकुमार, प्रमुख अतिथी म्हणून वासुदेवशहा टेकाम, जिल्हा उपनिबंधक एम. एल. गणवीर, नागपूरचे मधुमेह रोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर गिल्लुरकर उपस्थित राहणार आहेत. आरोग्य शिबिरासाठी नागपूर येथील डॉक्टरांची चमू येणार आहे, अशी माहिती कोवासे यांनी दिली.