गेवर्धा येथील दोन बोगस डॉक्टरांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:25 AM2021-07-01T04:25:20+5:302021-07-01T04:25:20+5:30

अटक केलेल्या त्या बोगस डॉक्टरांमध्ये हरोशित अभिलाष बिस्वास रा.मार्डी ता. मारेगाव जि. यवतमाळ (हल्ली मुक्काम गेवर्धा) आणि नासिर खान ...

Two bogus doctors arrested in Gevardha | गेवर्धा येथील दोन बोगस डॉक्टरांना अटक

गेवर्धा येथील दोन बोगस डॉक्टरांना अटक

googlenewsNext

अटक केलेल्या त्या बोगस डॉक्टरांमध्ये हरोशित अभिलाष बिस्वास रा.मार्डी ता. मारेगाव जि. यवतमाळ (हल्ली मुक्काम गेवर्धा) आणि नासिर खान उस्मान खान पठाण रा. गेवर्धा यांचा समावेश आहे. त्यांच्याविरोधात भादंवि कलम ३३६, ४१९, ४२० अन्वये तसेच महाराष्ट्र वैद्यक व्यवसायी अधिनियम १९६१ चे कलम ३३ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला.

ही कारवाई भरारी पथक प्रमुख तहसीलदार सोमनाथ माळी, पोलीस निरीक्षक सुधाकर देडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश दामले, पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे, तसेच तहसील, आरोग्य विभाग आणि पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाद्वारे करण्यात आली.

(बॉक्स)

अजून ३८ डॉक्टरांवर कारवाई केव्हा?

तालुक्यात मोठ्या प्रमाणात बोगस डाॅक्टरांचा सुळसुळाट झालेला आहे. यापूर्वी मालेवाडा येथील एका अवैध वैद्यकीय व्यावसायिक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी जवळपास एक महिन्यापूर्वी एक पत्रक काढत ४० बोगस डॉक्टरांची यादी प्रसिद्ध केली होती. त्यातील केवळ दोन डॉक्टरांवर आता कारवाई झाली. त्या यादीतील उर्वरित ३८ डॉक्टरांवर कारवाई कधी होणार, याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Two bogus doctors arrested in Gevardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.