वीजेच्या धक्क्याने दोन म्हशी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 11:52 PM2018-05-07T23:52:30+5:302018-05-07T23:52:30+5:30
येथील पावीमुरांडा रस्त्याकडील लक्ष्मी राईसमिलच्या मागील बोडीच्या पाळीलगत गेल्या १५ दिवसांपासून विद्युत तारा तुटून पडल्या होत्या. या तारांना स्पर्श झाल्याने दोन म्हशींचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोधी (मो.) : येथील पावीमुरांडा रस्त्याकडील लक्ष्मी राईसमिलच्या मागील बोडीच्या पाळीलगत गेल्या १५ दिवसांपासून विद्युत तारा तुटून पडल्या होत्या. या तारांना स्पर्श झाल्याने दोन म्हशींचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली.
वादळामुळे १५ दिवसांपूर्वी या मार्गावरील गार्डिंग तार तुटून पडले होते. याची माहिती महावितरणच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली. रस्त्याची तार जोडण्यात आली. मात्र राईस मिल मागील तुटलेल्या तारेकडे माहिती अभावी कर्मचाºयांचे लक्ष गेले नाही. त्यामुळे घटना घडली, असे समजते. लिलाबाई किरमे, गुरूदास सूरजागडे यांच्या मालकीच्या प्रत्येकी एक अशा दोन म्हशी ठार झाल्या. चामोर्शी पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. मृत पावलेल्या म्हशींमधील लिलाबाई किरमे यांची म्हैैस दुधाळू होती तर गुरूदास सूरजागडे यांची म्हैैस गाभण होती. महावितरणच्या निष्काळजीपणामुळी ही घटना घडली. तांत्रिक माहितीनुसार गार्डींग जिवंत विद्युत प्रवाह नसतो. मात्र म्हशी चरावयास नेताना पडलेल्या तारांमध्ये म्हशी गुंडाळल्याने विद्युत लाईनवरील विद्युत प्रवाह असलेल्या तारांना सदर तारांचा स्पर्श होऊन म्हशी ठार झाल्या.