कोचिनारा जंगलात आढळले दोन हत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 10:27 PM2019-06-11T22:27:47+5:302019-06-11T22:28:29+5:30
कोरची येथून एक किमी अंतरावर असलेल्या कोचिनाराच्या जंगलात भरकटलेले दोन हत्ती दिसून आले आहेत. या हत्तींना बघण्यासाठी नागरिकांनी जंगलात गर्दी केली आहे. कोचिनारा येथील गुराखी संदीप टेकाम याला दोन हत्ती जंगलात दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : कोरची येथून एक किमी अंतरावर असलेल्या कोचिनाराच्या जंगलात भरकटलेले दोन हत्ती दिसून आले आहेत. या हत्तींना बघण्यासाठी नागरिकांनी जंगलात गर्दी केली आहे.
कोचिनारा येथील गुराखी संदीप टेकाम याला दोन हत्ती जंगलात दिसून आले. त्याने गावात येऊन याबाबतची माहिती दिली. जंगली हत्ती बघण्यासाठी नागरिकांमध्ये फार मोठा कुतूहल असल्याने नागरिक सदर हत्ती बघण्यासाठी जंगलात गेले. याबाबतची माहिती बेडगावचे वन परिक्षेत्राधिकारी यांना देण्यात आली. बेडगाववरून वन विभागाचा ताफा हत्तींकडे गेला. गर्दी पाहून हत्ती पिसाळले होते. वनपाल विजय चिलमवार याला सोंडाने ढकलून दिले. त्यामुळे वनपाल गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने कोरची येथील रूग्णालयात दाखल केले. सदर हत्ती छत्तीसगडच्या जंगलातून वाट चुकून कोरचीच्या जंगलात आले असावे, असा अंदाज आहे. हत्तींमुळे दहशत पसरली आहे.