वाघाच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार, तिसरीला पळवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2021 05:00 AM2021-10-28T05:00:00+5:302021-10-28T05:00:20+5:30

वनपरिक्षेत्र कार्यालय कुनघाडा रै.,  उपक्षेत्र जोगना येथे दिलेल्या तक्रारीनुसार, शेळी मालक पोचू येगावार हे दररोजच्याप्रमाणे कक्ष  क्रमांक ४० च्या जंगल परिसरात आपल्या शेळ्या चारण्यासाठी गेले होते. यावेळी दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने झडप घालून दोन शेळ्यांना जागीच ठार केले. याशिवाय एका जखमी शेळीला जंगलात पळवून नेले. शेळी मालकाने आरडाओरड केली, पण वाघाच्या भीतीपोटी कोणीच मदतीसाठी आले नाही . 

Two goats were killed in a tiger attack and a third escaped | वाघाच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार, तिसरीला पळवले

वाघाच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार, तिसरीला पळवले

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : वनपरिक्षेत्र कार्यालय कुनघाडा रै. अंतर्गत येणाऱ्या जोगना उपक्षेत्रातील कुथेगाव जंगल परिसरात बुधवारी वाघाने दोन शेळ्यांना जागीच ठार केले. याशिवाय एका शेळीला जबड्यात पकडून जंगलात पळवून नेले. पोचू गंगा येगावार असे शेळी मालकाचे नाव आहे. ही घटना दुपारी एक ते दीड वाजताच्या दरम्यान घडली. 
वनपरिक्षेत्र कार्यालय कुनघाडा रै.,  उपक्षेत्र जोगना येथे दिलेल्या तक्रारीनुसार, शेळी मालक पोचू येगावार हे दररोजच्याप्रमाणे कक्ष  क्रमांक ४० च्या जंगल परिसरात आपल्या शेळ्या चारण्यासाठी गेले होते. यावेळी दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने झडप घालून दोन शेळ्यांना जागीच ठार केले. याशिवाय एका जखमी शेळीला जंगलात पळवून नेले. शेळी मालकाने आरडाओरड केली, पण वाघाच्या भीतीपोटी कोणीच मदतीसाठी आले नाही . 

आठवडाभरात दुसरा हल्ला
-    घटनेची माहिती मिळताच क्षेत्र सहायक विवेकानंद चांदेकर आणि वनरक्षक बी.एन. गोटा यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याच  हप्त्यात २३ ऑक्टोबर रोजी बांधोना जंगल परिसरात इरई येथील एका वृद्ध महिलेला वाघाने गंभीर जखमी केले होते. आता शेळ्या मारल्यामुळे परिसरात वाघाची दहशत पसरली  असून नागरिक धास्तावले आहेत. 
-   सध्या खरीप हंगाम कापणी व बांधणीच्या कामाला सुरुवात झाल्यामुळे परिसरातील नागरिक शिंद कापण्यासाठी जंगलात जात असतात. नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, एकटेदुकटे जंगलात फिरू नये, रात्रीच्या वेळी जंगलात जाणे टाळावे, असे आवाहन क्षेत्रसहायक चांदेकर यांनी केले आहे.

Web Title: Two goats were killed in a tiger attack and a third escaped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ