मदत केंद्रासाठी दोन हेक्टर वनजमीन वळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 11:59 PM2017-11-08T23:59:25+5:302017-11-08T23:59:35+5:30

जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील कटझेरी येथे पोलीस मदत केंद्र इमारतीच्या बांधकामासाठी दोन हेक्टरची संरक्षित वनजमीन वळती करण्यास मान्यता देण्यात आली असून .....

Two hectare forest land for help center | मदत केंद्रासाठी दोन हेक्टर वनजमीन वळती

मदत केंद्रासाठी दोन हेक्टर वनजमीन वळती

Next
ठळक मुद्देवनमंत्र्यांचा पुढाकार : कटेझरीत होणार इमारत

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील कटझेरी येथे पोलीस मदत केंद्र इमारतीच्या बांधकामासाठी दोन हेक्टरची संरक्षित वनजमीन वळती करण्यास मान्यता देण्यात आली असून राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
या पोलीस मदत केंद्रामुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास तसेच अवैध वृक्षतोड रोखण्यास मदत होणार आहे. पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन मंत्रालयाने सार्वजनिक हिताच्या दृष्टीने उपयुक्त पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी पाच हेक्टरपर्यंतची वन जमीन वळती करण्याच्या प्रस्तावांना मान्यता देण्याचे अधिकार राज्य शासनाला प्रदान केले आहेत. या अधिकाराचा वापर करून वनमंत्री म्हणून यासंबंधीच्या अटी आणि शर्तींचे पालन करत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
गडचिरोली हा केंद्र शासनाने देशातील ६० नक्षलग्रस्त प्रभावित जिल्ह्यांच्या यादीत समाविष्ट केलेला जिल्हा आहे. वळती करण्यात आलेली वनजमीन ही या नक्षलग्रस्त भागातील जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाच्या कामासाठी वापरण्यात येणार असल्याने त्यास मान्यता देण्यात आली आहे.

Web Title: Two hectare forest land for help center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.