चामोर्शीच्या ग्रामीण रुग्णालयात आठवडाभरात दोन मातामृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:39 AM2021-05-21T04:39:28+5:302021-05-21T04:39:28+5:30
जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असूनही चामोर्शी येथील आरोग्य व्यवस्था नागरिकांसाठी जीवघेणी ठरत आहे. येथे उपचाराकरिता येणाऱ्या गरोदर महिला, बालक ...
जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असूनही चामोर्शी येथील आरोग्य व्यवस्था नागरिकांसाठी जीवघेणी ठरत आहे. येथे उपचाराकरिता येणाऱ्या गरोदर महिला, बालक व मातांना साध्या उपचाराकरिताही गडचिरोलीला रेफर केले जाते. अनेक गोरगरीब महिला जिल्हा रुग्णालयात जात नाही. रुग्णांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षकांचा मोबाईल बंद असतो. सध्या ते आपल्या मूळ गावी सुटीवर गेल्याचे सांगितले जाते. परंतु येथील कारभारात सुधारणा करण्यासाठी रुग्णालयाचा कोणीच वाली नाही.
कोरोना विषाणूजन्य परिस्थितीत वैद्यकीय सेवा सुदृढ असणे व नागरिकांच्या आरोग्याचा खेळखंडोबा होऊ नये यासाठी ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र यांची सेवा सर्वसामान्य गोरगरिबांसाठी मोलाची आहे.
(बॉक्स)
अधीक्षकांना रुग्णांचे वावडे
आ.डॉ.देवराव होळी यांनी या रुग्णालयाला भेट दिली असता येथील वैद्यकीय अधीक्षक कोणत्याही रुग्णांवर उपचार करीत नाही असा तक्रारीचा सूर अनेकांनी लावला. भाजयुमोने या प्रकाराचा निषेध व्यक्त करत तत्काळ नवीन वैद्यकीय अधीक्षकांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी केली. रुग्णालयाच्या कारभारात लवकर सुधारणा न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.