सुरजागडमधील खाणविरोधी मोर्चात सहभागी दोन नक्षलींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2021 02:22 PM2021-10-28T14:22:02+5:302021-10-28T15:13:38+5:30

२६ ऑक्टोबररोजी नागरिकांच्यावतीने सुरजागड उत्खननाच्या अनुषंगाने रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत काही नक्षली सामिल झाले असल्याची गोपनीय विशेष अभियान पथकाला मिळाली होती. त्या अनुषंगाने कारवाई करत जवानांनी या जहाल नक्सल्यांना पकडले

Two Naxals arrested in anti-mining protest in Surjagad | सुरजागडमधील खाणविरोधी मोर्चात सहभागी दोन नक्षलींना अटक

सुरजागडमधील खाणविरोधी मोर्चात सहभागी दोन नक्षलींना अटक

googlenewsNext
ठळक मुद्देशासनाने जाहीर केले होते ४ लाखांचे बक्षीस

गडचिरोली : सुरजागड पहाडावरील लोहखनिज उत्खननाविरोधात मंगळवारी काढण्यात आलेल्या रॅलीत सामिल झालेल्या दोन नक्षलींना पकडण्यात गडचिरोली पोलीस दलाच्या जवानांना यश आले आहे. 

मुडा मासा झोडी (वय ३२, रा. गोरगुट्टा, तह. एटापल्ली) व मैनु दोरपेटी (रा. बोडमेटा, तह. एटापल्ली) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

गेल्या ३ दिवसांपासून सुरजागड पहाडावरील प्रस्तावित खाणी रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलनकर्त्यांनी एटापल्लीतील हेडरी नाक्यावर ठिय्या आंदोलन पुकारले आहे. २६ ऑक्टोबररोजी नागरिकांच्यावतीने सुरजागड उत्खननाच्या अनुषंगाने रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत काही नक्षली सामिल झाले असल्याची गोपनीय माहिती विशेष अभियान पथकाला मिळाली होती. त्या अनुषंगाने कारवाई करत जवानांनी या जहाल नक्षलवाद्यांना पकडले.

मुडा झोडीवर जंगल परिसरात झालेल्या चकमकीचे ३ गुन्हे दाखल आहेत. तो गट्टा दलममध्ये भरती होऊन शसस्त्र दलम सदस्य पदावर कार्यरत होता. तसेच, नक्षलच्या अॅक्शन टीमचा सदस्य होता. तर, जनमिलीशिया सदस्य मैनु दोरपेटी हा सुरजागड रोडवर केलेला खून व गट्टा पोस्ट अटॅक अशा दोन गुन्ह्यांमध्ये सहभागी होता. तो नक्षल्यांच्या हिंसक कृत्यांमध्ये नेहमी सामील होऊन घटना घडवून आणण्यात मदत करायचा. या दोन्हींवरती दोन-दोन लाखांचे बक्षीस शासनाकडून जाहीर करण्यात आले होते.

दरम्यान, दरम्यान, एटापल्ली तालुक्यात आदिवासींचे वास्तव्य असलेल्या पारंपरिक वन क्षेत्रातील सुरजागड भागात सरकारकडून लोहखनिज उत्खनन प्रस्तावित करण्यात आले आहे. याला लोकांचा सुरुवातीपासून तीव्र विरोध होता. तर आता सरकारने अतिरिक्त २५ खाणींना मजुरी दिली. ही मंजुरी रद्द करण्याची आंदोलकांची मागणी आहे. या मागणीसाठी गेल्या ३ दिवसांपासून शेकडो आदिवासी जमले असून मंगळवारी खाणी रद्द करण्याच्या मागणीसाठी विशाल मोर्चा काढण्यात आला होता.

Web Title: Two Naxals arrested in anti-mining protest in Surjagad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.