गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; दोन नक्षलवाद्यांचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 10:10 AM2019-09-15T10:10:57+5:302019-09-15T10:11:50+5:30
कोरची तालुक्यातील ग्यारापत्ती जंगल परिसरात रविवारी (15 सप्टेंबर) चकमक झाली आहे.
गडचिरोली - कोरची तालुक्यातील ग्यारापत्ती जंगल परिसरात रविवारी (15 सप्टेंबर) चकमक झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या सी-60 पथकातील जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास ही चकमक घडली.
ग्यारापत्ती जंगल परिसरात सी - 60 पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल पोलीस पथकानेही नक्षलवाद्यांत्या दिशेने गोळीबार केला. या चकमकीत काही नक्षली ठार तर काही जखमी झाल्याची माहिती आहे. आतापर्यंत दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलीस पथकाच्या हाती लागल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
#Maharashtra: Two naxals killed in encounter with security forces in Gadchiroli's Gyarapatti village.
— ANI (@ANI) September 15, 2019