गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून दोन नागरिकांची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 01:59 PM2019-02-02T13:59:13+5:302019-02-02T15:19:48+5:30
नक्षलवाद्यांनी गेल्या २५ जानेवारीपासून सुरू केलेले हत्यासत्र अजूनही थांबलेले नाही. शनिवारी (दि.२) पुन्हा धानोरा तालुक्यातील दोन निरपराध नागरिकांची हत्या करण्यात आली. गिरमा कुडयामी आणि समरू अशी मृतांची नावे आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नक्षलवाद्यांनी गेल्या २२ जानेवारीपासून सुरू केलेले हत्यासत्र अजूनही थांबलेले नाही. शनिवारी (दि.२) पुन्हा धानोरा तालुक्यातील दोन निरपराध नागरिकांची हत्या करण्यात आली. गिरमा कुडयामी आणि समरू अशी मृतांची नावे आहेत.
हे दोघे काही दिवसांपासून गडचिरोलीत राहात असल्याची माहिती आहे. शुक्रवारी ते आपल्या गावी परतल्यानंतर नक्षल्यांनी त्यांना रात्री सोबत नेऊन पहाटे त्यांची हत्या केली. त्यानंतर दि.२२ ला भामरागड तालुक्यातील तीन जणांची हत्या केली.
२५ ते ३१ जानेवारीदरम्यान नक्षलवाद्यांनी प्रतिकार सप्ताह पाळण्याचे आवाहन केले होते. यादरम्यान पुन्हा भामरागड व एटापल्ली तालुक्यात २ जणांची हत्या केली होती. आता धानोरा तालुक्यात दोन जणांची हत्या केल्याने गेल्या ११ दिवसांत हत्या झालेल्यांची संख्या ७ झाली आहे.
नक्षलवाद्यांच्या हालचालींची माहिती पोलिसांना देत असल्याच्या संशयातून सदर हत्या केल्या जात आहेत. परंतू नक्षली बळी घेत असलेले निरपराध नागरिक आमचे खबरी नाहीत, असे पोलीस सांगत आहेत.