रांगीत दोन भावंडांची घरे भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 11:51 PM2019-05-14T23:51:20+5:302019-05-14T23:51:41+5:30

धानोरा तालुक्यातील रांगी येथील तीन घरांना सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास आग लागली. सिलिंडरच्या स्फोटामुळे आगीने रौद्र रूप धारण केल्याने दोन घरे पूर्णपणे जळून खाक झाली, तर एक घर अर्धवट जळाले. आग नेमक्या कोणत्या कारणामुळे लागली हे कळू शकले नाही.

The two siblings used to burn the rhythms | रांगीत दोन भावंडांची घरे भस्मसात

रांगीत दोन भावंडांची घरे भस्मसात

Next
ठळक मुद्देतीन तासानंतर विझविली आग : सिलिंडरच्या स्फोटाने धारण केले रौद्ररूप

लोकमत न्यूज नेटवर्क
रांगी : धानोरा तालुक्यातील रांगी येथील तीन घरांना सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास आग लागली. सिलिंडरच्या स्फोटामुळे आगीने रौद्र रूप धारण केल्याने दोन घरे पूर्णपणे जळून खाक झाली, तर एक घर अर्धवट जळाले. आग नेमक्या कोणत्या कारणामुळे लागली हे कळू शकले नाही.
रांगी येथील चंदू सोनटक्के व बंडू सोनटक्के या दोन भावंडाच्या कुटुंबातील सर्व सदस्य तेंदू पाने तोडण्याकरिता बाहेरगावला गेले होते. सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास त्यांच्या घरातून धूर निघत असल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात आले. गावकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात आली नाही. या आगीत घरात ठेवलेल्या दोन पैकी एका सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे आगीने पुन्हा रौद्ररूप धारण केले. ही आग जवळपास तीन तास पेटत होती. दोन तासानंतर अग्निशमन दलाचे वाहन आले. त्यानंतर आग आटोक्यात आली.
या आगीत चंदू सोनटक्के, बंडू सोनटक्के यांच्या मालकीचे एक घर व गंगाधर साखरे यांच्या मालकीचे एक घर जळून खाक झाले. तसेच पुष्पा गुलाब अंबादे यांच्या घराचे थोड्याफार प्रमाणात नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच नायब तहसीलदार भगत यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. या आगीत चंदू सोनटक्के यांचे २ लाख ३८ हजार ३००, बंडू सोनटक्के यांचे २ लाख रुपयांचे, गंगाधर साखरे ६० हजार तर पुष्पा अंबादे यांचे ५ हजार रुपयांचे नुकसान झाले.
आग विझविण्यासाठी भाजपा तालुकाध्यक्ष शशिकांत साळवे, रांगीचे सरपंच जगदिश कन्नाके, उपसरपंच नरेंद्र भुरसे, प्रल्हाद उंदीरवाडे, लोभाजी दुग्गा, देवराव काटेंगे तसेच गावातील नागरिकांनी मदत केली. आगीचे कारण अजुनही गुलदस्त्यात आहे. शॉर्टसर्कीटमुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला आहे. सोनटक्के व साखरे यांना मदत देण्याची मागणी गावकºयांनी केली आहे.
 

Web Title: The two siblings used to burn the rhythms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग