दोन हजार गाड्या पंक्चर
By Admin | Published: March 11, 2016 01:59 AM2016-03-11T01:59:09+5:302016-03-11T01:59:09+5:30
चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेव येथे महाशिवरात्री यात्रेनिमित्त दर्शनासाठी भाविक विविध वाहनांनी दाखल होत आहेत.
मार्र्कंडादेव परिसरातील मार्ग खड्डेमय : भाविकांमध्ये तीव्र नाराजी
मार्र्कंडादेव : चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेव येथे महाशिवरात्री यात्रेनिमित्त दर्शनासाठी भाविक विविध वाहनांनी दाखल होत आहेत. मात्र मार्र्कंडादेव परिसरातील अनेक मार्ग खड्डेमय झाल्याने जवळपास दोन हजार गाड्या यात्रा सुरू झाल्यापासून पंक्चर झाल्या आहेत. त्यामुळे भाविक व नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मार्र्कंडादेव परिसरातील चामोर्शी- मार्र्कंडादेव, मूल- भेंडाळा- मार्र्कंडादेव, चाकलपेठ- मार्र्कंडादेव, हरणघाट- घारगाव- रामाळा- मार्र्कंडादेव मार्गाची दुरवस्था झाल्याने मार्र्कंडादेव येथे दर्शनासाठी जाणाऱ्या अनेक भाविकांची वाहने पंक्चर झाली आहेत. मार्ग खड्डेमय असल्याने भाविकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. जागतिक कीर्तीचे वास्तूशिल्प असलेल्या मार्र्कंडादेवकडे जाणाऱ्या मार्गांची योग्य दुरूस्ती करण्यात आली नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भाविकांचे हाल होत आहे. उन्हात अनेकांना आपल्या दुचाक्या कुटुंबासह ढकलत न्याव्या लागल्या. (वार्ताहर)