झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी दोन हजार किमीची पेट्रोलिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:21 AM2019-06-22T00:21:51+5:302019-06-22T00:22:49+5:30

झाडाच्या फांद्या तुटून वीज तारांवर कोसळून वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात अधिक घडतात. मान्सूनपूर्व देखभाल व दुरूस्ती करताना महावितरणने वीज तारांवर आलेल्या झाडाच्या फांद्या तोडण्यावर विशेष भर दिला आहे.

Two thousand kilometers of petrol to break tree branches | झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी दोन हजार किमीची पेट्रोलिंग

झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी दोन हजार किमीची पेट्रोलिंग

Next
ठळक मुद्देमान्सूनपूर्व नियोजन : अखंडित वीज पुरवठ्यासाठी महावितरणचे प्रयत्न; गंजलेले वीज खांब बदलविले

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : झाडाच्या फांद्या तुटून वीज तारांवर कोसळून वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात अधिक घडतात. मान्सूनपूर्व देखभाल व दुरूस्ती करताना महावितरणने वीज तारांवर आलेल्या झाडाच्या फांद्या तोडण्यावर विशेष भर दिला आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आलापल्ली व गडचिरोली विभागातील सुमारे २ हजार १९० किलोमीटर अंतर पेट्रोलिंग करून वीज तारांवर लोंबकळत असलेल्या झाडांच्या फांद्या तोडल्या आहेत. मात्र तरीही तांत्रिक बिघाडामुळे वीज प्रवाह खंडित होण्याचे प्रकार वाढल्यामुळे वीज ग्राहकांची ओरड सुरू झाली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश वीज तारा जंगलातून गेल्या आहेत. काही ठिकाणी अगदी झाडाला रेटून वीज लाईन टाकण्यात आली आहे. वाढणाºया झाडाच्या फांद्या वीज तारांपर्यंत पोहोचतात. पावसाळ्यात वादळ आल्यानंतर झाडांच्या फांद्या वीज तारांना स्पर्श करतात. त्यामुळे झाडांमध्ये विद्युत प्रवाह सुरू होऊन दुर्घटना घडण्याची शक्यता राहते. झाडाच्या फांद्यांमुळे दोन वीज तारांचा एकमेकांना स्पर्श झाल्यास स्पार्र्किंग होऊन वीज पुरवठा खंडीत होतो. गडचिरोली जिल्ह्यात झाडांमुळेच वीज पुरवठा खंडीत होण्याचे सर्वाधिक प्रकार घडतात.
महावितरणच्या कर्मचाऱ्यांनाही पावसाळ्याच्या दिवसात बरीच धावपळ करावी लागते. यामुळे महावितरण मान्सूनपूर्व देखभाल व दुरूस्ती करताना वीज तारांवर आलेल्या झाडांच्या फांद्या तोडण्यावर सर्वाधिक भर देत असल्याचे दिसून येते. मागील वर्षभरात वीज कर्मचाºयांनी गडचिरोली विभागात १ हजार ४६० किलोमीटर तर आलापल्ली विभागात ७३० किमीची पेट्रोलिंग करून वीज तारांवर आलेल्या झाडांच्या फांद्या तोडल्या आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर हे काम अधिक गतीने आणि ईमानदारीने होणे अपेक्षित असते. परंतू थोड्या वादळातही वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे हे काम योग्यप्रकारे झाली नाही की काय, अशी शंका वीज ग्राहकांकडून व्यक्त केली जात आहे.

मुख्यालय सोडल्यास कारवाई
गडचिरोली जिल्ह्यात पावसाळ्यात विजेमुळे अनेक दुर्घटना घडतात. बहुतांश वीज लाईन जंगलातून गेली आहे. त्यामुळे पाऊस किंवा वादळ आल्यानंतर वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार सुध्दा वाढतात. वीज उपकरणांमधील बिघाड वेळीच दुरूस्त व्हावा, यासाठी प्रत्येक वीज कर्मचाऱ्याला मुख्यालयी राहून सेवा देणे बंधनकारक करण्यात आले आहे. एखाद्या कर्मचाऱ्यांनी परवानगीशिवाय मुख्यालय सोडल्यास त्याच्यावर कारवाई करण्याचे निर्देश महावितरणने वरिष्ठ अधिकाºयांना दिले आहेत.

४०० इन्सुलेटर बदलविले
एका खांबावरून दुसºया वीज खांबावर वीज तारा नेताना इन्सुलेटर हा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजाविते. पावसाळ्यामध्ये इन्सुलेटर तुटण्याच्या घटना अधिक घडतात. इन्सुलेटर तुटल्यास वीज पुरवठा खंडीत होतो. वीज पुरवठा खंडीत न झाल्यास वीज तारांना वीज पुरवठा सुरू राहून तो खांबापर्यंत पोहोचून दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महावितरणने तुटण्याच्या स्थितीत असलेले २५० पिन इन्सुलेटर व १३६ डिस्क इन्सुलेटर बदलविले आहेत. ६९ ट्रान्सफार्मरचे आॅईल बदलविण्यात आले आहे. १५ ठिकाणचे डीटीसी केबल, १०५ क्षतिग्रस्त झालेले खांब बदलविण्यात आले आहेत. तसेच ९६ ठिकाणच्या वीज तारा ओढण्यात आल्या आहेत.

वीज तारा तुटल्या असल्यास नागरिकांनी त्या तारांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करू नये. तुटलेल्या तारांची माहिती महावितरणला द्यावी. एखाद्या झाडावरून वीज तारा गेल्या असल्यास झाडात विद्युत प्रवाह येऊन दुर्घटना घडण्याची शक्यता राहते. त्यामुळे अशा झाडाची माहिती महावितरणला द्यावी. प्रत्येक वीज ग्राहकाचा फोन स्वीकारून लाईट ब्रेकडाऊन झाली असल्यास ती तत्काळ दुरूस्त करण्याच्या सूचना महावितरणच्या अधिकारी व कर्मचाºयांना दिल्या आहेत.
- विजय मेश्राम,
कार्यकारी अभियंता,
महावितरण गडचिरोली

Web Title: Two thousand kilometers of petrol to break tree branches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.