दाेन वाघांच्या शिकारी टाेळीची पुन्हा काेठडीत रवानगी

By गेापाल लाजुरकर | Published: July 27, 2023 09:49 PM2023-07-27T21:49:20+5:302023-07-27T21:49:29+5:30

आंबेशिवणीच्या जंगलात केली हाेती शिकार

Two tiger hunters sent back to custody | दाेन वाघांच्या शिकारी टाेळीची पुन्हा काेठडीत रवानगी

दाेन वाघांच्या शिकारी टाेळीची पुन्हा काेठडीत रवानगी

googlenewsNext

गडचिराेली : तालुक्याच्या आंबेशिवणी येथील जंगलात दाेन वाघांची शिकार प्रकरणात अटकेत असलेल्या बावरिया जमातीच्या १३ आराेपींना वनविभागाने दुसऱ्यांदा गुरुवारी जिल्हा न्यायालयात हजर केले. न्यायालयाने १३ पैकी ११ आराेपींची २ ऑगस्टपर्यंत वन काेठडीत रवानगी केली तर दाेन महिला आराेपींना ९ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन काेठडी सुनावली.

गडचिराेली तालुक्याच्या आंबेशिवणी येथील पटाच्या जागेवर अस्थायी स्वरुपात राहून त्याच जंगलातील दाेन वाघांची शिकार केल्याची कबुली आराेपी करमचंद बावरी याने वनाधिकाऱ्यांना तपासादरम्यान दिली हाेती. त्यानुसार त्या आराेपीला घटनास्थळी व वाघांचे अवयव पुरलेल्या ठिकाणी नेऊन त्याची चाैकशी करण्यात आली.

सुरुवातीला न्यायालयाने आराेपींना २७ जुलैपर्यंत वन काेठडी सुनावली हाेती. गुरुवारी १३ आराेपींना जिल्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ११ आराेपींना २ ऑगस्टपर्यंत वन काेठडी तर दाेन महिला आराेपींना ९ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन काेठडी सुनावली, अशी माहिती गडचिराेली वन विभागाचे उपवन संरक्षक मिलिश शर्मा यांनी दिली.

Web Title: Two tiger hunters sent back to custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.