मुरूम व रेतीची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 12:59 AM2017-10-05T00:59:57+5:302017-10-05T01:00:12+5:30

अवैैधरित्या रेती व मुरूमाची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त करून संबंधित चालकावर दंडात्मक कारवाई देसाईगंजच्या नायब तहसीलदारांनी बुधवारी केली.

Two tractors of Murmu and Sandeep were seized | मुरूम व रेतीची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त

मुरूम व रेतीची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त

Next
ठळक मुद्देदंड वसूल : नायब तहसीलदारांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : अवैैधरित्या रेती व मुरूमाची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त करून संबंधित चालकावर दंडात्मक कारवाई देसाईगंजच्या नायब तहसीलदारांनी बुधवारी केली.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे देसाईगंजचे नायब तहसीलदार उपेश अंबादे, मंडळ अधिकारी कावळे व तलाठी चट्टे यांनी गस्तीवर असताना रेती व मुरूमाची अवैध वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर अडविले. यामध्ये एमएच-३३-३३६८ क्रमांकाचा ट्रॅक्टर विनापरवाना रेतीची वाहतूक करीत असल्याचे आढळून आले. सदर ट्रॅक्टर विसोरा येथील विनोद बुद्धे यांच्या मालकीचा आहे. तसेच एमएच-३३-एफ-२२८२ हे संशयास्पद ट्रॅक्टर जावक पावती असल्याच्या आधारावर मुरूमाची वाहतूक करीत असताना दिसून आले. कुरखेडा मार्गावरील टी-पार्इंटवर या ट्रॅक्टरला पकडण्यात आले. सदर ट्रॅक्टर देसाईगंज येथील पत्रकार राजरतन मेश्राम यांच्या मालकीचा आहे. सदर दोन्ही ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. दंडात्मक कारवाई करून संबंधिताकडून बंद पत्र लिहून ट्रॅक्टर सोडण्यात आले. या कारवाईमुळे गौण खनिजाची अवैधरित्या खनन करणाºयांचे धाबे दणाणले आहेत. सदर कारवाई महसूल अधिकारी व कर्मचाºयांनी पार पाडली.

Web Title: Two tractors of Murmu and Sandeep were seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.