बसचालकाला मारहाण करणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:08 AM2021-02-06T05:08:45+5:302021-02-06T05:08:45+5:30
गडचिराेली : दारूच्या नशेत बससमाेर दुचाकी चालवून बसला साईड न देणाऱ्या तसेच बसचालकाला मारहाण करणाऱ्या दाेन आराेपींना ...
गडचिराेली : दारूच्या नशेत बससमाेर दुचाकी चालवून बसला साईड न देणाऱ्या तसेच बसचालकाला मारहाण करणाऱ्या दाेन आराेपींना न्यायालयाने सहा महिन्यांचा कारावास व सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
रजनिकांत मधुकर गाेहणे (२३), आशिष शिवाजी गाेहणे दाेघेही रा.कान्हाेली ता.चामाेर्शी अशी आराेपींची नावे आहेत. २६ डिसेंबर २०१९ राेजी गडचिराेली आगाराची बस कळमगाववरून कान्हाेली मार्गे चामाेर्शीकडे परत येत हाेती. दरम्यान रजनिकांत व आशिष हे दाेघेही दारू पिऊन दुचाकी चालवत हाेते. बसचालकाने हाॅर्न वाजविल्यानंतरही साईड देत नव्हते, तसेच कान्हाेली बसस्थानकावर बस थांबवून बसचालकाला शिवीगाळ करून मारहाण केली. गावातील नागरिक धावून आल्यानंतर दाेघांनीही दुचाकी साेडून पळ काढला. याबाबतची तक्रार बसचालकाने चामाेर्शी पाेलीस स्टेशनमध्ये दाखल केली. चाैकशीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
पाेलीस हवालदार विक्रांत साखरे यांनी प्रकरण न्यायालयात दाखल केले. आराेपींविराेधात सबळ पुरावे आढळून आल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रेणी-२ दे.ग.कांबळे यांनी आराेपींना सहा महिन्यांचा कारवास व सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभयाेक्ता एस.यू.कुंभारे यांनी बाजू मांडली.