दुचाकीस्वाराचा वाघाकडून पाठलाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 05:00 AM2020-12-21T05:00:00+5:302020-12-21T05:00:37+5:30

१८ डिसेंबर राेजी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास बाेडधा येथील पांडुरंग राऊत व त्यांचा मुलगा प्रवीण हे दाेघेजण पाेर्लावरून बाेडधाकडे दुचाकीने आपल्या गावाकडे जात हाेते. दरम्यान पाेर्ला गावाजवळच्या जंगलात रस्त्यावर तीन पट्टेदार वाघ उभे हाेते. त्यातील दाेन वाघ रस्त्याच्या बाजूला झाले. तर त्यातील एका वाघाने दुचाकीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. वाघ पाठलाग करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर प्रवीणने दुचाकीचा वेग वाढविला,

The two-wheeler was chased by a tiger | दुचाकीस्वाराचा वाघाकडून पाठलाग

दुचाकीस्वाराचा वाघाकडून पाठलाग

Next
ठळक मुद्देकोंढाळा ते उसेगाव मार्गावर वाघाचे दर्शन

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : दुचाकीने जात असताना वाघाने पाठलाग केल्याची घटना शुक्रवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास पाेर्ला-वडधा मार्गावर घडली. पाेर्ला ते देलाेडा गावापर्यंत जंगल आहे. पाेर्ला गाव ओलांडताच जंगलाला सुरूवात हाेते. याच जंगलात मागील अनेक वर्षांपासून वाघाचा अधिवास आहे. त्यामुळे या मार्गाने ये-जा करणाऱ्या नागरिकांना वाघाचे दर्शन हाेते. १८ डिसेंबर राेजी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास बाेडधा येथील पांडुरंग राऊत व त्यांचा मुलगा प्रवीण हे दाेघेजण पाेर्लावरून बाेडधाकडे दुचाकीने आपल्या गावाकडे जात हाेते. दरम्यान पाेर्ला गावाजवळच्या जंगलात रस्त्यावर तीन पट्टेदार वाघ उभे हाेते. त्यातील दाेन वाघ रस्त्याच्या बाजूला झाले. तर त्यातील एका वाघाने दुचाकीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. वाघ पाठलाग करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर प्रवीणने दुचाकीचा वेग वाढविला, अशी माहिती राऊत यांनी दिली आहे.

कोंढाळा ते उसेगाव मार्गावर वाघाचे दर्शन
कुरुड : काेंढाळा येथील काही महिला रविवारी साक्षगंधाचा कार्यक्रम आटाेपून ट्रॅक्टरने गावाकडे परत येत असताना उसेगावच्या वळणावर वाघ दिसून आला. गावात येताच ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. काेंढाळा जंगलात अनेकवेळा वाघाचे दर्शन झाले आहे. याच जंगल परिसरात आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. वाघाची दहशत असतानाही जीव धाेक्यात घालून शेतीची कामे करावी लागत आहेत. वाघाचा बंदाेबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.

Web Title: The two-wheeler was chased by a tiger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ