देवदर्शनासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 10:56 IST2023-10-17T10:48:50+5:302023-10-17T10:56:20+5:30
तेलंगणातील कालेश्वरमच्या गोदावरी त्रिवेणी संगमावरील घटना

देवदर्शनासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू
सिराेंचा (जि. गडचिरोली) : तेलंगणातील कालेश्वरममध्ये देवदर्शनासाठी गेलेल्या सिरोंचा तालुक्यातील दोघांचा कालेश्वरम येथे गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाला. दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले.
सुरेश गोपाल चिलमुला (४५, रा. सिरोंचा माल, ता. सिरोंचा) व कोनम रामेश्वर (३०, रा. रंगधामपेठा, ता. सिरोंचा) अशी मयतांची नावे आहेत. ते दोघे १५ ऑक्टोबरला तेलंगणातील कालेश्वरमच्या गोदावरी त्रिवेणी संगमावर बुडाले.
त्यानंतर त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण ते सापडले नाहीत. १६ रोजी दोघांचेही मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळले. तेलंगणातील महादेवपूर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले. त्यानंतर ते नातेवाइकांच्या स्वाधीन केले. अधिक तपास महादेवपूर पोलिस करत आहेत.