धानाेरा तालुक्यात दाेन युवकांनी गळफास घेऊन संपवले जीवन
By दिगांबर जवादे | Published: August 25, 2023 10:23 PM2023-08-25T22:23:33+5:302023-08-25T22:23:36+5:30
हिरामण दराे हा तुकुम येथील मूळ रहिवासी असून तो मेंढा (लेखा) येथे घरजावई म्हणून गेला होता
गडचिराेली : दाेन वेगवेगळ्या घटनांमध्ये धानाेरा तालुक्यातील दाेन युवकांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २५ ऑगस्ट राेजी घडली. हिरामण कोल्लू दरो (३५) रा. तुकुम, रवींद्र कोटरंगे (३५) रा. धानाेरा असे आत्महत्या करणाऱ्या युवकांची नावे आहेत.
हिरामण दराे हा तुकुम येथील मूळ रहिवासी असून तो मेंढा (लेखा) येथे घरजावई म्हणून गेला होता. हिरामण हा काही वर्षांपासून पत्नीपासून वेगळा राहत हाेता. आत्महत्येपूर्वी तो बाहेर राज्यातील खासगी कंपनीमध्ये वाहन चालविण्यासाठी गेला होता. दोन महिन्यांपूर्वी तुकूम येथे आई-वडिलांकडेच राहत हाेता. दरम्यान शुक्रवारी सकाळी ८ वाजता त्याने आत्महत्या केली. हिरामणच्या पश्चात पत्नी, एक मुलगी आहे.
दुसऱ्या घटनेत धानोरा येथील इंदिरानगरातील रवींद्र कोटरंगे (३५) हा युवकाने दारूच्या नशेत स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. गळफास घेतलेल्या युवकाची पत्नी सुद्धा तीन महिन्यांपूर्वी आपल्या मुलांना घेऊन माहेरी निघून गेली हाेती. अधिक तपास पोलिस विभाग धानोरा करीत आहे.