उज्ज्वला पुन्हा चुलीवर, कनेक्शन माेफत; पण गॅस कसा भरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:41 AM2021-08-13T04:41:55+5:302021-08-13T04:41:55+5:30
यापूर्वी उज्ज्वला याेजनेला सुरुवात झाली. त्यावेळी गॅसच्या किमती अतिशय कमी हाेत्या. त्यामुळे गॅसवर स्वयंपाक करणे परवडेल, या उद्देशाने अनेकांनी ...
यापूर्वी उज्ज्वला याेजनेला सुरुवात झाली. त्यावेळी गॅसच्या किमती अतिशय कमी हाेत्या. त्यामुळे गॅसवर स्वयंपाक करणे परवडेल, या उद्देशाने अनेकांनी गॅस जाेडण्या घेतल्या. त्यानंतर गॅसच्या किमती दुप्पट वाढल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक नागरिकांनी गॅस भरणे बंद केले आहे. रिकामे सिलिंडर घरी पडून आहे, तर पुन्हा चुलीवरच स्वयंपाक सुरू केला असल्याचे दिसून येत आहे.
’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’
काेट
सिलिंडर भरणे कसे परवडणार
ज्यावेळी गॅस खरेदी केला. त्यावेळी गॅसच्या किमती अतिशय कमी हाेत्या. आता मात्र त्या प्रचंड वाढल्या आहेत. केवळ स्वयंपाक करण्यासाठी महिन्याचे एक हजार रुपये खर्च करणे शक्य नाही. परिणामी आता चुलीवरच स्वयंपाक केला जात आहे.
-उषा बन्साेड, गृहिणी
’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’
उज्ज्वला याेजनेतून खरेदी केलेला सिलिंडर घरातच पडून आहे. पूर्वीही आम्ही चुलीवरच स्वयंपाक करीत हाेताे. आताही चुलीवरच स्वयंपाक करीत आहेत. जुनेच दिवस आलेत. चुलीवरचा स्वयंपाक गॅसच्या तुलनेत रुचकर लागतो. तसेच गॅस सिलिंडरचा स्फाेट हाेण्यासारख्या घटनांपासून दूर राहता येते.
- काशीबाई पेंदाम, गृहिणी
’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’
जानेवारी २०२०-६६८ रुपये
जानेवारी २०२१-७६४ रुपये
ऑगस्ट २०२१-९०४ रुपये