सार्वजनिक कचराकुंड्या बनल्या उकिरडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:39 AM2021-04-09T04:39:13+5:302021-04-09T04:39:13+5:30
चामाेर्शी शहरातील प्रभाग १५ मध्ये संतोष सुरावार यांच्या घराशेजारी असलेली स्मार्ट कचराकुंडी कचऱ्याने तुडुंब भरली असून त्याखाली केरकचरा सांडून ...
चामाेर्शी शहरातील प्रभाग १५ मध्ये संतोष सुरावार यांच्या घराशेजारी असलेली स्मार्ट कचराकुंडी कचऱ्याने तुडुंब भरली असून त्याखाली केरकचरा सांडून दुर्गंधी येत आहे. चांगल्या जागेवर कचराकुंडी लावल्याने ही कचराकुंडी हटवावी, अशी प्रतिक्रिया या भागातील नागरिकांध्ये उमटत आहे. लाखो रुपये खर्च करून खरेदी केलेल्या कचराकुंड्या दुर्लक्षित आहेत. त्यामुळे काही कचराकुंड्या अल्पावधीतच मोडकळीस आल्या आहेत. तसेच प्लास्टिक कचराकुंड्या सफाई कामगारांना उचलून त्या घंटागाडीत टाकता याव्या यासाठी लावण्यात आल्या, मात्र त्यासुद्धा गायब झाल्या आहेत. यात केवळ प्रशासन जबाबदार नाही तर नागरिकांनी सुध्दा स्वच्छतेसाठी जागृत राहून घरातील कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याची गरज असल्याचे मत काही सुज्ञ नागरिक व्यक्त करीत आहेत. लोखंडी स्टँड असलेल्या भागावर ओला कचरा व सुका कचरा अशा दोन कचराकुंड्या आहेत. मात्र कचराकुंडीमध्ये कचरा मावत नसतानाही कचरा टाकून नागरिक उकिरडा निर्माण करण्यास हातभार लावत आहेत. यासाठी नागरिक व प्रशासन यात योग्य समन्वय साधून दैनंदिन साफसफाई करून नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून कचरा कुंड्यातील कचऱ्याची विल्हेवाट लावावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.