अखेर अहेरीत जळाऊ बिट व बांबू उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 11:10 PM2018-09-10T23:10:55+5:302018-09-10T23:11:13+5:30
अहेरी शहर व परिसरातील गावांमध्ये अंत्यविधीसाठी जळावू लाकुड बिट व बांबू उपलब्ध होत नसल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत होती. अंत्यविधीसाठी ५ते ६ हजार रुपये खर्च करून जळाऊ लाकूड बाहेरून विकत घ्यावे लागत होते. यामुळे नागरिकांना जास्तीचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी वनाधिकाऱ्यांशी चर्चा करून अहेरी येथे जळाऊ लाकुड बिट व बांबू उपलब्ध करून दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : अहेरी शहर व परिसरातील गावांमध्ये अंत्यविधीसाठी जळावू लाकुड बिट व बांबू उपलब्ध होत नसल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत होती. अंत्यविधीसाठी ५ते ६ हजार रुपये खर्च करून जळाऊ लाकूड बाहेरून विकत घ्यावे लागत होते. यामुळे नागरिकांना जास्तीचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी वनाधिकाऱ्यांशी चर्चा करून अहेरी येथे जळाऊ लाकुड बिट व बांबू उपलब्ध करून दिले.
नागरिकांकडून वनविभाग आलापल्लीकडे अहेरी येथे जळावू लाकुड बिट व बांबू उपलब्ध करून देण्याची वारंवार मागणी करूनही त्याकडे वनविभागातर्फे दुर्लक्ष केले जात होते. याबाबत भाजपा पदाधिकाऱ्यांनी ही समस्या पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांना दिली. विषयाची गांभिर्याने दखल घेत पालकमंत्री आत्राम यांनी आलापल्ली वनविभागाचे उपवनसंरक्षक तांबे व अहेरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी चौहान यांना पाचारण करून नागरिकांची भावना लक्षात घेऊन व त्यांचे आर्थिक भुर्दंड कमी व्हावा यासाठी २ दिवसात अहेरी येते जडावू लाकूड व बांबू शासकीय दरात उपलब्ध करून देण्याचे आदेश त्यांना दिले. त्यांनतर लगेच २४ तासातच अहेरी येतील पॉवर हाऊस कॉलनी येथील वन विभागाच्या कार्यालयात जळावू बिट व बांबू वन विभागातर्फे सामान्य जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. शासकीय दरानुसार, अंत्यविधीसाठी फक्त ४०० रुपयांत जळावू बिट व बांबू अहेरी शहरात उपलब्ध झाल्याने नागरिकांना मोठी सोय झाली आहे, मागील अनेक वर्षांपासूनची ही मागणी आत्ता पूर्ण झाल्याने लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.त्यांनी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांचे आभार मानत समाधन व्यक्त केले आहे.