अनधिकृत तंबाखू व दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 06:00 AM2019-11-10T06:00:00+5:302019-11-10T06:00:43+5:30

भगत यांनी सुगंधीत तंबाखूबाबतची माहिती सिरोंचाचे पोलीस निरिक्षक अहीरकर यांना दिली. रात्री ९ वाजताच्या सुमारास वाहन सिरोंचात दाखल होताच पोलिसांनी वाहन अडवून तपासणी केली. त्यामध्ये सुगंधीत तंबाखू आढळून आला. सुगंधीत तंबाखू रमेश दुर्गे याच्या मालकीचा असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

Unauthorized tobacco and alcohol seizure | अनधिकृत तंबाखू व दारू जप्त

अनधिकृत तंबाखू व दारू जप्त

Next
ठळक मुद्देसिरोंचा व देसाईगंज येथे कारवाई । अहेरी तालुक्यातून होते सुगंधित तंबाखूची वाहतूक

लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : सिरोंचा येथे नेला जात असलेला ३० हजार रुपये किमतीचा सुगंधीत तंबाखू सिरोंचा पोलिसांनी जप्त केला आहे. सदर कारवाई शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
एमएच ३३-५९४५ या खासगी प्रवाशी वाहन सिरोंचाकडे प्रवाशी घेऊन जात होते. सदर वाहन अहेरी तालुक्यातील बोरी येथे थांबविण्यात आले. या ठिकाणी सुगंधीत तंबाखूने भरलेले पोते ठेवण्यात आले. मुक्तीपथचे सिरोंचा तालुका संघटक सुनील भगत हे सुध्दा याच वाहनातून प्रवास करीत होते. भगत यांनी सुगंधीत तंबाखूबाबतची माहिती सिरोंचाचे पोलीस निरिक्षक अहीरकर यांना दिली. रात्री ९ वाजताच्या सुमारास वाहन सिरोंचात दाखल होताच पोलिसांनी वाहन अडवून तपासणी केली. त्यामध्ये सुगंधीत तंबाखू आढळून आला. सुगंधीत तंबाखू रमेश दुर्गे याच्या मालकीचा असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे, ज्या वाहनातून सुगंधीत तंबाखूची वाहतूक केली जात होती, ते वाहन सिरोंचा येथील एका पंचायत समिती सदस्याचे असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

१५ हजारांची दारू जप्त
सिरोंचा शहरातील वार्ड क्रमांक १० मध्ये एक महिला दारूची विक्री करीत असल्याची माहिती प्राप्त झाली. मुक्तीपथ चमुने धाड टाकली असता, घरून १५८ बॉटल दारू आढळून आली. याची किंमत १५ हजारांच्या आसपास आहे. तसेच सिरोंचा तालुक्यातील जाफराबाद येथेही पोलिसांच्या सहकार्याने दारू काढणाऱ्यांच्या घरी धाडी टाकल्या. एका व्यक्तीच्या घरून गुळाचा एक ड्राम सडवा जप्त केला आहे.

कोरेगाव व कुरूड येथे धाडी
देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव व कुरूड या गावांमध्ये मुक्तीपथ व देसाईगंज पोलीस यांनी संयुक्तपणे धाडी टाकल्या. कोरेगाव येथील मानिक रामटेके आणि भास्कर वैद्य यांच्या घरून १०० बॉटल जप्त केल्या. दोघांनाही पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. कुरूड गावातील चार विक्रेत्यांकडून १५० दारूच्या बॉटल जप्त केल्या आहेत. सदर कारवाई पोलीस उपनिरिक्षक गुरूकर, सहायक पोलीस निरिक्षक बावणकर, भोयर यांच्यासह मुक्तीपथ चमुने केली. गोपाळ चिंचोळकर, तुळशीराम भोयर, किसन भोयर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Unauthorized tobacco and alcohol seizure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.