गडचिरोलीत इमारती फाट्यांची अनधिकृत वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 06:16 PM2020-04-04T18:16:31+5:302020-04-04T18:17:43+5:30
कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा नियतक्षेत्रात बेकायदेशिरपणे इमारती फाट्यांची वाहतूक करणारा ट्रॅक्टर वन कर्मचाऱ्यांच्या पथकाने जप्त केला. ही कारवाई ३ एप्रिलच्या रात्री १०.३० वाजता करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा नियतक्षेत्रात बेकायदेशिरपणे इमारती फाट्यांची वाहतूक करणारा ट्रॅक्टर वन कर्मचाऱ्यांच्या पथकाने जप्त केला. ही कारवाई ३ एप्रिलच्या रात्री १०.३० वाजता करण्यात आली.
उन्हाळ्यात जंगलाला वनवा लागण्याची शक्यता अधिक असल्याने वन विभागामार्फत गस्ती पथक नेमण्यात आले आहे. ३ एप्रिल रोजी रात्री वन कर्मचारी गस्त घालत असताना जांभुळखेडा नियतक्षेत्रात ट्रॅक्टर दिसून आले.
वन कर्मचाऱ्यांनी एमएच ३६, जी ९४९३ क्रमांकाच्या ट्रॅक्टरचा पाठलाग करून ट्रॅक्टर थांबविला. त्या ट्रॅक्टरमध्ये जवळपास १५० इमारती फाटे आढळून आले. वाहन चालकाकडे फाट्यासंदर्भात कोणताही वैध परवाना नसल्याने ट्रॅक्टर मालक मनोज आत्माराम मातोरे रा.लेंढारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर ट्रॅक्टर वन परिक्षेत्र कार्यालय कुरखेडा येथे फाट्यांसह जप्त करण्यात आला.
सदर कारवाई क्षेत्र सहायक हेमंतकुमार झोडगे, वनरक्षक उत्तरा मोहुर्ले, नितूपाल नाकाडे, वाहनचालक इरफान पठाण यांच्या पथकाने केली. अधिक तपास वन परिक्षेत्राधिकारी सुनील सोनटक्के व क्षेत्र सहायक शिवशंकर कायते करीत आहेत.