पेट्रोल-डिझेल पंपांवरील सुविधांबाबत अनभिज्ञता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 01:17 AM2017-07-19T01:17:52+5:302017-07-19T01:17:52+5:30

अनेक पेट्रोल पंपांवर वाहनधारकांना पेट्रोल देताना कमी पेट्रोल दिले जात असल्याच्या तक्रारी नेहमीच होत असतात.

Unaware of the facilities on petrol and diesel pumps | पेट्रोल-डिझेल पंपांवरील सुविधांबाबत अनभिज्ञता

पेट्रोल-डिझेल पंपांवरील सुविधांबाबत अनभिज्ञता

Next

जिल्ह्यात २९ पंप : पण अधिकारांची माहितीच नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अनेक पेट्रोल पंपांवर वाहनधारकांना पेट्रोल देताना कमी पेट्रोल दिले जात असल्याच्या तक्रारी नेहमीच होत असतात. परंतू पेट्रोलच्या पुरवठ्यापासून तर पंपांवर नियमानुसार सुविधा दिल्या जातात किंवा नाही याची तपासणी संबंधित कंपन्यांकडून होत नाही. ग्राहकांनाही या सुविधा कोणत्या त्याची जाणीव नाही. त्यामुळे पंपचालकांचे चांगलेच फावत आहेत.
जिल्ह्यातील १२ तालुक्यांमध्ये एकूण २९ पेट्रोल व डिझेल पंप आहेत. त्यात हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन आॅईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि रिलायन्स पेट्रोल या कंपन्यांचे पंप आहेत. त्या सर्व ठिकाणी ज्या ११ सुविधा वाहनधारकांसाठी असणे गरजेचे आहे त्या ९० टक्के पंपांवर दिसल्याच नाहीत. गडचिरोली शहरात हिंदुस्थान पेट्रोलियमच्या चंद्रपूर मार्गावरील पंपावर बऱ्यापैकी सुविधा आहेत. इतर ठिकाणी हवा भरण्याचीही सुविधा दिसली नाही.

Web Title: Unaware of the facilities on petrol and diesel pumps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.