कुरुड पीएचसी अंतर्गत ९९ टक्के बालकांना मिळाला पाेलिओ डाेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:47 AM2021-02-05T08:47:47+5:302021-02-05T08:47:47+5:30

कुरुड प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत काेंढाळा, शिवराजपूर, फरी, झरी, तुळशी, काेकडी हे सात गावे येतात. या गावांमध्ये एकूण १ हजार ...

Under Kurud PHC, 99% of the children got Paleo Dodge | कुरुड पीएचसी अंतर्गत ९९ टक्के बालकांना मिळाला पाेलिओ डाेज

कुरुड पीएचसी अंतर्गत ९९ टक्के बालकांना मिळाला पाेलिओ डाेज

Next

कुरुड प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत काेंढाळा, शिवराजपूर, फरी, झरी, तुळशी, काेकडी हे सात गावे येतात. या गावांमध्ये एकूण १ हजार २८० लाभार्थी आहेत. त्यापैकी १ हजार २६६ बालकांना पहिल्याच दिवशी पाेलिओ डाेज देण्यात आले. १९ बुथवर ४३ आराेग्य कर्मचारी नेमण्यात आले हाेते. जवळपास १ टक्के बालके पाेलिओ माेहिमेच्या दिवशी पाेलिओचा डाेज घेण्यासाठी आले नाहीत. त्यांचा शाेध घेऊन त्यांनाही डाेज पाजला जाणार आहे. १०० टक्के बालकांना पाेलिओ डाेज देणे हे येथील आराेग्य कर्मचाऱ्यांचे उद्दिष्ट आहे. कुरुड येथील प्राथमिक आराेग्य केंद्राच्या प्रांगणात पाेलिओ डाेज देण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी देसाईगंज पंचायत समितीच्या सदस्य अर्चना ढाेरे, कुरुड पीएचसीचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. पी. जी. सडमेक, आराेग्य कर्मचारी पी. एम. खुरसे, जी. पी. कुर्वे, एस. टी. येरमे, पी. एन. उईके आदी उपस्थित हाेते.

Web Title: Under Kurud PHC, 99% of the children got Paleo Dodge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.