अल्पवयीन चालक देतात अपघाताला आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:39 AM2021-08-26T04:39:13+5:302021-08-26T04:39:13+5:30

शहरातील नाल्यांची दुरुस्ती करा गडचिरोली : शहरात अनेक नाल्यांच्या बाजूला असलेल्या रस्त्यांची वारंवार दुरुस्ती झाल्याने रस्ते उंच आणि नाल्या ...

Underage drivers offer an invitation to an accident | अल्पवयीन चालक देतात अपघाताला आमंत्रण

अल्पवयीन चालक देतात अपघाताला आमंत्रण

Next

शहरातील नाल्यांची दुरुस्ती करा

गडचिरोली : शहरात अनेक नाल्यांच्या बाजूला असलेल्या रस्त्यांची वारंवार दुरुस्ती झाल्याने रस्ते उंच आणि नाल्या खाली गेल्या आहेत. शिवाय शहरातील रस्ते अरुंद असल्याने अनेक वाहनेही नालीत पडून अपघात होण्याची शक्यता असते. या नाल्यांवर कोणतेच आच्छादन नसल्यानेही किरकोळ अपघात घडतात. गाेकुळ नगर माता मंदिर परिसरात अनेक नाल्या अर्धवट आहेत. या भागात दरवर्षी नवनवीन घरांचे बांधकाम हाेत आहे. नाल्या नसल्याने नवीन घरातील सांडपाणी रस्त्यावर तसेच माेकळ्या जागांवर पसरत आहे.

सिरोंचा तालुक्यातील बसथांब्याची दुरवस्था

सिरोंचा : अहेरी ते गडचिरोली आगारातून सिरोंचा तालुक्याच्या ग्रामीण भागात बस सोडल्या जातात. प्रवाशांच्या सोयीसाठी प्रवासी निवारे बांधण्यात आली आहेत. मात्र, प्रवासी निवाऱ्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाले असल्याने त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. बऱ्याच प्रवासी निवाऱ्यांचे टिनपत्रे वादळाने उडाले आहेत. अनेक ठिकाणच्या बसथांब्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. वारंवार तक्रार करूनही प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. अहेरी उपविभागातील अनेक गावांत प्रवासी निवारे नाहीत.

अहेरी शहरातील अतिक्रमण काढा

अहेरी : शहरात रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. प्रशासनाने हे अतिक्रमण तत्काळ काढावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. यापूर्वीही अनेकदा मागणी करण्यात आली. मात्र, दुर्लक्षच झाले आहे. अतिक्रमणामुळेच रस्ते अरुंद झाले असून, अपघाताचे प्रमाण वाढू शकते. दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत असल्याने आवागमन करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी हाेत आहे.

अभयारण्यातील गावांचे पुनर्वसन रखडले

आष्टी : चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरातील चपराळा अभयारण्यांतर्गत चपराळा व इतर लहान-मोठी चार ते पाच गावे येतात. या अभयारण्यातील पशूंमुळे गावकऱ्यांना धोका आहे. आजपर्यंत वन्य पशूंचे अनेक हल्ले नागरिकांवर झाले आहेत. त्यामुळे या गावांचे पुनर्वसन करण्याची मागणी नागरिकांकडून हाेत आहे. अभयारण्यातील गावांचे पुनर्वसन रखडल्यामुळे संबंधित नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

अनेक घरांची दुरवस्था कायम

गडचिरोली : कॉम्प्लेक्स परिसरात जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी व जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी ५०० घरांची स्वतंत्र कॉलनी वसविण्यात आली आहे. या कॉलनीतील घरांची दुरवस्था झाली आहे. या घरांमध्ये राहणेही कठीण झाले आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासनाच्या वतीने घरांची पक्की दुरुस्ती करण्यात आली नाही. बऱ्याच वर्षांपूर्वीची जुनी काैलारू निवासस्थाने कायम आहेत. प्रशासनाने याबाबतच्या कार्यवाहीबाबत याेग्य नियाेजन करावे, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.

गांधी वॉर्डात फवारणीची मागणी

गडचिरोली : स्थानिक गांधी वॉर्डात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने येथे फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मागील अनेक दिवसांपासून या वाॅर्डात फवारणी करण्यात आली नाही. त्यामुळे येथे डासांची उत्पत्ती वाढली आहे. गांधी वॉर्डात दाट लोकवस्ती आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नाल्या आहेत. स्नेहनगरातही अनेक ठिकाणच्या नाल्या कचऱ्याने भरलेल्या आहेत. परिणामी पावसाचे व सांडपाणी वाहून जाण्यास अडचण निर्माण झाली आहे. नगर परिषद उदासीन असल्याचे दिसून येते.

Web Title: Underage drivers offer an invitation to an accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.