काॅंग्रेसतर्फे उंदीरवाडे व विधाते यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:44 AM2021-09-07T04:44:01+5:302021-09-07T04:44:01+5:30
गडचिरोली : आधुनिक काळात तंत्रज्ञान विकसित झाले असले तरी गुरुस्थानी अजूनही काहीही बदल झालेले दिसून येत नाहीत. गुरूची महती ...
गडचिरोली : आधुनिक काळात तंत्रज्ञान विकसित झाले असले तरी गुरुस्थानी अजूनही काहीही बदल झालेले दिसून येत नाहीत. गुरूची महती आजही कायम आहे. आजही अनेक शिक्षक संपूर्ण आयुष्य ज्ञानदानासाठी खर्च घालून उत्तम पिढी निर्माण करण्याचे कार्य करीत आहेत. असेच कार्य करणारे सेवानिवृत्त शिक्षक कवडू उंदीरवाडे यांचा जिल्हा युवक काँग्रेस व शहर काँग्रेसतर्फे शिक्षक दिनाचे औचित्य साधून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला सेवानिवृत्त वनपरिक्षेत्र अधिकारी शालिग्राम विधाते, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, नंदू वाईलकर, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक सतीश विधाते, जितेंद्र मुनघाटे, प्रतीक बारसिंगे, राजीवशहा मसराम, रोहिणी मसराम, माधुरी पाटोती, गौरव येनप्रेड्डीवार, सर्वेश पोपट, कुणाल ताजने, मयूर गावतुरे, गुरुदेव पगाडे, अमजत खान, हेमंत मोहितकर, समीर ताजने आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सैनिकी शाळेच्या शिक्षकांचा सत्कार
गडचिराेली : शिक्षक दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे स्थानिक गोंडवाना सैनिकी विद्यालयात शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बारापात्रे, शहर कार्याध्यक्ष कपिल बागडे, महिला जिल्हा सरचिटणीस रेखा बारापात्रे उपस्थित होते. रवींद्र वासेकर व याेगेश नांदगाये यांच्याहस्ते प्रा. राकेश चडगुलवार, प्रा. रूपेश बारसागडे, मनोहर वालको, भूपेश वैरागडे, वामण गेडाम यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य संजीव गोसावी, उपप्राचार्य ओमप्रकाश संग्रामे, पर्यवेक्षक अजय वानखेडे, ऋषी वंजारी, रवींद्र कोरे, रहिम पटेल, गजानन अनमुलवार, गजानन ढोले, सुरेश रेचनकर, किशोर साठवणे, तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.