दुर्दैवी; उद्घाटनाच्या दिवशीच विजेच्या धक्क्याने आटाचक्की मालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 11:25 AM2021-06-10T11:25:56+5:302021-06-10T11:26:18+5:30

Gadchiroli News चामोर्शी तालुक्यातील मुधोली चक नं. २ येथे आटाचक्की सुरू करुन दळण दळत असताना इलेक्ट्रिक शॉक लागून चक्कीच्या मालकाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान घडली.

Unfortunate; The owner of the flour mill was killed by an electric shock on the day of the inauguration | दुर्दैवी; उद्घाटनाच्या दिवशीच विजेच्या धक्क्याने आटाचक्की मालक ठार

दुर्दैवी; उद्घाटनाच्या दिवशीच विजेच्या धक्क्याने आटाचक्की मालक ठार

googlenewsNext

 लोकमत न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील मुधोली चक नं. २ येथे आटाचक्की सुरू करुन दळण दळत असताना इलेक्ट्रिक शॉक लागून चक्कीच्या मालकाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान घडली.

देवाजी गोविंदा सुरकर (६५) वर्षे रा. मुधोली चक नं. २ असे मृताचे नाव आहे. देवाजी सुरकर यांनी जोडव्यवसाय म्हणून आटाचक्की सुरू केली होती. बुधवारी देवाजी यांनी नारळ फोडून व पूजापाठ केली. चक्कीला सुरू करण्यासाठी गेले असता विजेचा जबर धक्का लागून ते खाली कोसळताना छतावर असलेल्या मुलास आवाज दिला. मुलाने खाली उतरून मीटरवरील वीज पुरवठा खंडित केला. मात्र तोपर्यंत ते जागेवरच मरण पावले होते.

पोलीस उपनिरीक्षक गणेश जंगले यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी रवाना केला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Web Title: Unfortunate; The owner of the flour mill was killed by an electric shock on the day of the inauguration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू