विद्यापीठातील गैरप्रकाराची चाैकशी हाेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:37 AM2021-02-10T04:37:07+5:302021-02-10T04:37:07+5:30
गडचिराेली : गाेंडवाना विद्यापीठात क्रीडांगण बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचा आराेप नंदू नराेटे यांनी निवेदनातून केला आहे. या गैरप्रकाराची चाैकशी ...
गडचिराेली : गाेंडवाना विद्यापीठात क्रीडांगण बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचा आराेप नंदू नराेटे यांनी निवेदनातून केला आहे. या गैरप्रकाराची चाैकशी करणार, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आविसचे सरसेनापती नंदू नराेटे यांना दिले. नराेटे यांनी ना. सामंत यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. निवेदनात विविध मागण्यांचा समावेश आहे. यामध्ये गाेंडवाना विद्यापीठाकरिता शहरालगत असलेली झुडपी जंगलाची १०० एकर जागा हस्तांतरित करावी. माॅडल काॅलेज तत्काळ सुरू करावे. पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांचे संशाेधन शुल्क कमी करावे. विद्यापीठात आदिवासी अध्यासन केंद्र, स्त्री अध्यासन केंद्र व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र सुरू करावे. विद्यापीठाच्या दर्शनी भागात शहीद वीर बाबूराव शेडमाके यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा. रिक्त पदे भरण्यात यावीत. आदिवासी विद्यापीठ म्हणून विशेष दर्जा देण्यात यावा. स्थायी कुलगुरू व कुलसचिव नेमण्यात यावा आदी मागण्यांचा समावेश आहे.