विद्यापीठाने परीक्षा शुल्क माफ करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:39 AM2021-04-28T04:39:30+5:302021-04-28T04:39:30+5:30
याबाबत कुलगुरु, मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. निवेदनानुसार, मागील वर्षी कोरोनामुळे निर्माण झालेल्या टाळेबंदीत सर्वांचेच मोठे नुकसान ...
याबाबत कुलगुरु, मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.
निवेदनानुसार, मागील वर्षी कोरोनामुळे निर्माण झालेल्या टाळेबंदीत सर्वांचेच मोठे नुकसान झाले आहे. त्यात शैक्षणिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले. आता कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेची वाढती साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने संपूर्ण राज्यात टाळेबंदी लागू केली आहे. त्यामुळे शैक्षणिक कार्य ठप्प असून, विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यातच अनेकांच्या पालकांचे रोजगारही हिरावले गेले आहेत. त्यामुळे आभासी पद्धतीने होणाऱ्या परीक्षांचे पेपर देण्यासही विद्यार्थी असमर्थ ठरत आहेत. त्यामुळे विद्यापीठाने उन्हाळी परीक्षेचे परीक्षा शुल्क माफ करावे, ज्या परीक्षा झाल्या नाहीत, त्याचे परीक्षा शुल्क परत करावे, आभासी परीक्षेच्या वेळेस येणाऱ्या तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी विद्यापीठाने एकाच वेळेस सर्व विद्यार्थ्यांची सामूहिक परीक्षा घ्यावी. विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी हेल्पलाईन नंबर सुरू करावा तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यापीठाने आभासी शिबिरांचे आयोजन करावे, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.