घराला बाहेरून कुलूप लावून जिवंत जाळण्याचा प्रयत्न, वेळीच जाग आल्याने वाचला दाेघांचा जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2022 11:09 AM2022-01-30T11:09:39+5:302022-01-30T11:15:27+5:30

शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने घरात झोपलेल्यांना घरात कोंडून बाहेरून कुलूप लावून घर व दुचाकीला आग लावली. दरम्यान, घरात झाेपलेल्यांना वेळीच जाग आल्याने त्यांनी आपली सुटका केल्याने ते सुखरूप बचावले.

unknown person set to fire the house and try to burn alive two people inside | घराला बाहेरून कुलूप लावून जिवंत जाळण्याचा प्रयत्न, वेळीच जाग आल्याने वाचला दाेघांचा जीव

घराला बाहेरून कुलूप लावून जिवंत जाळण्याचा प्रयत्न, वेळीच जाग आल्याने वाचला दाेघांचा जीव

Next

गडचिरोली : रात्रीच्या वेळी घरात झोपलेल्यांना कोंडून बाहेरून कुलूप लावून घराला आग लावण्याचा प्रकार शुक्रवारच्या मध्यरात्री काेरची तालुक्यातील काेटगूल येथे घडला. घरातील लोकांना जीवंत जाळण्याचा प्रयत्न करणारी ती व्यक्ती कोण? याचा उलगडा अद्याप झालेला नाही. दरम्यान या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

सदर अज्ञात व्यक्तीने घराला बाहेरून कुलूप लावून घर व दुचाकीला आग लावली. दरम्यान, घरात झाेपलेल्यांना वेळीच जाग आल्याने त्यांनी आरडाओरड करत खिडकी तोडून आपली सुटका केल्याने ते सुखरूप बचावले. प्राप्त माहितीनुसार, कोटगूल येथील मुख्य बाजार चौकातील बिंदियाबाई चिमनसिंग हारामी (वय ६५ वर्षे) यांच्या मालकीच्या घरी मिलिंद टेंभूरकर आपल्या पत्नीसह भाड्याने वास्तव्यास होते.

शनिवारी रात्री टेंभूरकर कुटुंब झोपेत असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या मोटारसायकल व घराला आग लावली. आग लावण्याच्या पूर्वी टेंभूरकर यांच्या खाेलीच्या दरवाजाला कुलूप लावले. आग लागल्याचे लक्षात येताच टेंभूरकर कुटुंब जागे झाले. त्यांनी आरडाओरड करत मदतीसाठी बाजूच्या भाडेकरूला आवाज दिले. त्यांच्या मदतीने घराची खिडकी तोडून हे दाम्पत्य कसेबसे घराबाहेर निघाले आणि त्यांनी आपला जीव वाचवला. मात्र, दुचाकी जळून खाक झाली. 

या भाडेकरू टेंभूरकर यांच्या घरगुती सामानसह सोने-चांदी व मोटारसायकल, तसेच रोख रक्कम पकडून अंदाजे १ लाख ६० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. टेंभूरकर दाम्पत्याला घरात जीवंत पेटवून मारण्याचा प्रयत्न करणारा आरोपी कोण? याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले आहे.

गॅस सिलिंडरचाही स्फाेट

आगीत गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन घराची भिंत काेसळली. घरातील पूर्ण सामान जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार सी.आर. भंडारी व कोटगूल पोलीस मदत केंद्रातील पोलीस अधिकारी आनंद जाधव, तलाठी, पोलीस पाटील, गावातील प्रतिष्ठित नागरिक, कोतवाल यांनी घटनास्थळ गाठून झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामा केला.

Web Title: unknown person set to fire the house and try to burn alive two people inside

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.