लेबल नसलेल्या दारूचा पुरवठा

By admin | Published: September 26, 2016 01:28 AM2016-09-26T01:28:32+5:302016-09-26T01:28:32+5:30

पोलिसांच्या कारवाया वाढल्याने गडचिरोली शहरासह जिल्हाभरात दारूचा तुटवडा निर्माण झाला आहे.

Unlabeled liquor supplies | लेबल नसलेल्या दारूचा पुरवठा

लेबल नसलेल्या दारूचा पुरवठा

Next

नागरिकांचे आरोग्य धोक्यात : १५ दिवसांपासून दारूचा तुटवडा
गडचिरोली : पोलिसांच्या कारवाया वाढल्याने गडचिरोली शहरासह जिल्हाभरात दारूचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याचबरोबर लेबल नसलेली दारू अवैध दारू विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे. सदर दारू बनावट असून यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
गणेशोत्सवाच्या आठ दिवसांपूर्वीपासून गडचिरोली पोलिसांनी नाकेबंदी करण्यास सुरूवात केली आहे. स्थानिक पोलीस, उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वेगवेगळ्या ठिकाणी नाकेबंदी करून जिल्ह्यात येणाऱ्या दारूवर धाड टाकत आहेत. त्यामुळे दारू विक्रेत्याच्या घरी वाहनाने दारूचा पुरवठा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. परिणामी मागील १५ दिवसांपासून बहुतांश पुरवठादारांनी दारूचा पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या दरम्यान सुध्दा गडचिरोली शहरात दारूचा तुटवडा निर्माण झाला होता. हा तुटवडा अजुनही कायम आहे. काही पुरवठादार मात्र पोलिसांनाही न जुमानता दारूचा पुरवठा करीत आहेत. मात्र त्यांच्याकडून लेबल नसलेल्या दारूचा पुरवठा होत आहे. दारूची बॉटल पुन्हा उपयोगात आणली असावी हे स्पष्टपणे बॉटलच्या स्थितीवरून दिसून येते. त्याचबरोबर नियमित दारूच्या तुलनेत सदर दारूने अधिक नशा येत असल्याची माहिती दारू पिणाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र सदर दारू बनावट असल्याचे स्पष्ट होत आहे. दारू पिल्यानंतर अनेकांची तब्येत सुध्दा बिघडली आहे. त्यामुळे सदर दारू आरोग्यास हानीकारक असल्याचे दारू पिणाऱ्यांच्याही लक्षात आले आहे. मात्र दररोजच्या सवयीला दवाई नाही. या म्हणी प्रमाणे आरोग्यास हानीकारक असलेली दारू पिली जात आहे. (नगर प्रतिनिधी)

धाडसत्र आवश्यक
लेबल नसलेली बनावट दारू नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असल्याने गडचिरोली शहरातील सर्वच दारू विक्रेत्यांवर तत्काळ धाड टाकून सर्व दारू जप्त करणे आवश्यक आहे. अन्यथा या दारूमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Unlabeled liquor supplies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.