भरतीतून वगळल्याने अन्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 12:46 AM2017-10-07T00:46:40+5:302017-10-07T00:46:51+5:30
आरमोरी तालुक्याच्या पळसगाव ग्रामपंचायतीच्या शिपाई पदभरती प्रक्रियेदरम्यान अनेकवेळा चुकीच्या जाहिरात प्रकाशित करण्यात आल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
जोगीसाखरा : आरमोरी तालुक्याच्या पळसगाव ग्रामपंचायतीच्या शिपाई पदभरती प्रक्रियेदरम्यान अनेकवेळा चुकीच्या जाहिरात प्रकाशित करण्यात आल्या. शासकीय नियमावलीचा कुठलाही आधार न घेता ग्रामपंचायत पदाधिकारी व सचिवांनी संगणमत करून काही मोजक्या उमेदवाराच्या अर्जाची निवड केली. आपण गृहकर भरूनही नादेय प्रमाणपत्र ग्रा. पं. ने दिले नाही. याच कारणाने भरती प्रक्रियेतून वगळूून आपल्यावर अन्याय करण्यात आला, असा आरोप अन्यायग्रस्त उमेदवार जगदीश दडमल यांनी पत्रपरिषदेत केला.
८ आॅक्टोबरला होणारी पळसगाव ग्रामपंचायतीची शिपाई पदभरती प्रक्रिया तत्काळ स्थगित करून संबंधित ग्रामसेवक व पदाधिकाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी दडमल यांनी केली आहे. भरती प्रक्रियेसाठी १ ते ११ सप्टेंबरपर्यंत अर्ज मागविण्यात आले. त्यानंतर २१ सप्टेंबरला दुसरी जाहिरात काढण्यात आली. या दोन जाहिरातीत शिक्षणाची अट वेगवेगळी ठेवण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले.