ग्रामीण भागातील नागरिकांचा विनामास्क वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:38 AM2021-04-09T04:38:22+5:302021-04-09T04:38:22+5:30
अनेक ठिकाणी ‘नो मास्क, नो एन्ट्री असे फलक नावापुरतेच लावलेले असून, अनेकजण गावांत विना मास्क सर्रास फिरताना दिसून येत ...
अनेक ठिकाणी ‘नो मास्क, नो एन्ट्री असे फलक नावापुरतेच लावलेले असून, अनेकजण गावांत विना मास्क सर्रास फिरताना दिसून येत आहेत. प्रतिबंधात्मक विविध उपाययोजना आणि त्याला लाभलेले नागरिकांचे सहकार्य यामुळे कोविड १९चा प्रादुर्भाव मागील काही कालावधीत कमी झाला होता. तथापि कोरोना काळात लागू केलेले निर्बंध हळूहळू शिथिल केल्यानंतर अचानकपणे कोरोनाने पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली असल्याचे चित्र दिसत आहे. मास्क वापरणे बंधनकारक असताना त्याचे पालन होताना दिसून येत नाही.
चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रभावीपणे लसीकरणाची मोहीम सुरू आहे. आतापर्यंत ५००च्यावर नागरिकांनी लस घेतलेली आहे. अजूनही अनेक नागरिकांचे लसीकरण शिल्लक आहे. मास्कचे महत्व जनमानसात प्रसारित करण्यासाठी ‘मास्क नाही तर प्रवेश नाही’ ही मोहीम प्रभावी रितीने राबविण्यात यायला पाहिजे. परंतु त्याबाबत दुर्लक्ष होत असून, स्थानिक स्वराज्य संस्थांनीही हात टेकले आहेत. प्रवासी आणि ग्रामीण भागातील व्यापारी, रहिवासी व ग्राहकवर्ग त्याबाबत तितकासा गंभीर नसल्याचे आढळत आहे. त्यामुळे तालुका प्रशासनाने खबरदारीची उपाययोजना करण्याची खरी गरज आज निर्माण झाली आहे. कोरोना काळात ड्युटी केलेल्या शिक्षकांना भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रामधे कोरोना लसीचा पहिला डोस दिला. मागील वर्षी कोरोना महामारीच्या काळात चामोर्शी तालुक्यातील खासगी अनुदानित विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी जवळपास तीन ते चार महिने आपापल्या शाळेमध्ये असलेले विलगीकरण कक्ष, तालुका मुख्यालयी असलेले विलगीकरण कक्ष तसेच हरणघाट व आष्टी नाक्यावर ड्युटी केलेले आहेत. त्यामुळे अशा शिक्षकांना फ्रंटलाईन वर्कर समजून शिक्षकांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला.