भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता

By admin | Published: October 19, 2016 02:22 AM2016-10-19T02:22:49+5:302016-10-19T02:22:49+5:30

केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षात सध्या गडचिरोली शहरात प्रचंड अस्वस्थतेचे वातावरण आहे.

Unrest among BJP workers | भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता

भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता

Next

वादंग : नव्याने आलेल्यांना संधी दिल्याचा परिणाम
गडचिरोली : केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षात सध्या गडचिरोली शहरात प्रचंड अस्वस्थतेचे वातावरण आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी व नेतेही या वातावरणामुळे त्रस्त झाले असून पक्षात जुन्या लोकांचे ऐकून घेणारेच राहिलेले नाही, अशी खंत नाव न छापण्याच्या अटीवर एका नेत्याने लोकमतशी बोलताना व्यक्त केली.
गेले अनेक वर्ष विविध पक्ष व संघटना फिरून आलेल्या लोकांना भारतीय जनता पक्षाने नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर पक्षात प्रवेश दिला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी पक्षाच्या लोकप्रतिनिधींची व ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेतली व हे नेते आपल्या पक्षात प्रवेश करणार आहेत, असे सांगितले. मात्र त्यांना अटी, शर्तीवर प्रवेश देऊ नये, अशी सूचना करण्यात आली होती, अशी माहिती या ज्येष्ठ नेत्याने लोकमतला दिली. मात्र पक्षात प्रवेश होताच खासदारांनी बैठक घेऊन याच लोकांकडे गडचिरोली नगर पालिकेच्या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी सोपविली आहे. पक्षाच्या जुन्या नेत्यांनी केवळ सतरंज्या उचलायच्या काय, असा प्रश्न आता आमच्यासमोर पडला आहे. ज्या महिलेचे नाव नगराध्यक्ष पदासाठी पक्के करण्यात आले आहे. त्या नावावरही अनेकांना आक्षेप आहे. मात्र सामान्य कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास खासदार, आमदारांना वेळ नाही. केवळ वरून निर्णय खालच्या कार्यकर्त्यावर लादले जात आहे. त्यामुळे खालचा कार्यकर्ता नगर परिषद निवडणुकीतच नाही तर विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत आपली शक्ती पक्षाला दाखवून देईल, याची जाणीव या लोकप्रतिनिधी ठेवावी, असा दमही कार्यकर्ते आता पक्ष नेतृत्वाला देऊ लागले आहे. भाजपने नगराध्यक्ष पदासाठी अर्ज मागितले. मात्र योगीता प्रमोद पिपरे यांनाच उमेदवारी निश्चित होणार आहे, असा दावाही या नेत्याने लोकमतशी बोलताना केला. एवढेच नव्हे तर जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या अम्ब्रीशराव आत्राम यांनाही गडचिरोली नगर पालिकेच्या निवडणुकीबाबत विश्वासात घेण्यात आलेले नाही, अशी माहितीही या नेत्याने दिली. एकूणच या जबाबदार आणि ज्येष्ठ नेत्यांसह कार्यकर्त्यांच्या अस्वस्थतेमुळे पक्षाला आगामी निवडणुकीत मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Unrest among BJP workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.