...तोपर्यंत कृषीपंपांना होणार आता 24 तास वीज पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2022 05:00 AM2022-01-07T05:00:00+5:302022-01-07T05:00:22+5:30
कृषिपंपांना केवळ ८ तास वीज पुरवठा होईल, असे बुधवारच्या आदेशात वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जाहीर केले होते. त्यामुळे शेतकरी रब्बी पीक धोक्यात येण्याच्या कल्पनेने घाबरून गेले होते. आधीच नापिकीमुळे व कमी उत्पादनामुळे शेतकरी वर्ग डबघाईस आलेला आहे. त्यात फक्त ८ तासच वीजपुरवठा होणार, यामुळे तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी धास्तावले होते.
लाेकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : तालुक्यातील धान उत्पादक व इतर शेतकऱ्यांना फक्त ८ तास वीज पुरवठा करण्याबाबत वीज कंपनीने काढलेला ५ जानेवारीचा आदेश शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर दुसऱ्याचदिवशी बदलविला. यावर तोडगा निघेपर्यंत २४ तास वीज देणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे.
कृषिपंपांना केवळ ८ तास वीज पुरवठा होईल, असे बुधवारच्या आदेशात वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जाहीर केले होते. त्यामुळे शेतकरी रब्बी पीक धोक्यात येण्याच्या कल्पनेने घाबरून गेले होते. आधीच नापिकीमुळे व कमी उत्पादनामुळे शेतकरी वर्ग डबघाईस आलेला आहे. त्यात फक्त ८ तासच वीजपुरवठा होणार, यामुळे तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी धास्तावले होते.
दरम्यान, काही शेतकऱ्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. ५ जानेवारीला तालुक्यातील कृषीपंपधारक शेतकऱ्यांनी सुरेंद्रसिंह चंदेल, अविनाश गेडाम यांच्या नेतृत्वात देसाईगंज वीज वितरण कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले.
अन् संतप्त शेतकऱ्यांसमोर अधिकारी नरमले
- महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ६ जानेवारीला लोडशेडिंग करून सकाळी ९ वाजता पुन्हा लाईट सुरू केली. त्यामुळे सर्व शेतकरी संतप्त झाले. पुन्हा १२ वाजता महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी जमा झाले. यावेळी शेतकऱ्यांनी वीज पुरवठा करायचा असेल, तर २४ तास करा, अन्यथा वीज देऊच नका, अशी भूमिका घेतली.
- शेवटी त्यांचा आक्रोश पाहून वीज कंपनीचे अधिकारी नरमले व त्यांनी या समस्येवर जोपर्यंत तोडगा निघत नाही, तोपर्यंत २४ तासच वीज पुरवठा करण्यात येईल, असे सांगितले. त्यामुळे धान उत्पादक शेतकरी सुखावले. यावेळी नंदू चावला, विकास प्रधान, कोरेगावचे सरपंच प्रशांत किलनाके, चिंटू नाकाडे व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.