एसटी कर्मचाऱ्यांचे आजपासून उपाेषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:27 AM2021-06-02T04:27:21+5:302021-06-02T04:27:21+5:30
गडचिराेली : कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात एसटी कर्मचारी २ जूनपासून विभाग नियंत्रक कार्यालयासमाेर बेमुदत उपाेषण करणार आहेत. ...
गडचिराेली : कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात एसटी कर्मचारी २ जूनपासून विभाग नियंत्रक कार्यालयासमाेर बेमुदत उपाेषण करणार आहेत. याबाबतचे निवेदन विभागीय नियंत्रक यांना संघटनेच्यावतीने देण्यात आले आहे.
२०१६ ते २०२० या कालावधीत कामगार कराराचा कालावधी संपून एक वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र नवीन कराराविषयी कामगार संघटनांशी चर्चा करण्यात आली नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना पगार कमी मिळत आहे. ९ जून २०१८ राेजीच्या बैठकीतील निर्णयानुसार एसटी कर्मचारी व अधिकारी यांचा वेतनवाढीचा दर ३ टक्के करावा, तसेच घरभाडे ८ टक्के, १६ टक्के, २४ टक्के एवढा द्यावा. २०१६ ते २०२० या मधील कराराच्या फरकाची व रजा राेखीकरणाची थकीत रक्कम तातडीने देण्यात यावी आदी मागण्यांसाठी गडचिराेली येथे उपाेषण आंदाेलन केले जाईल, असा इशारा कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचे विभागीय सचिव दीपक मांडवे यांनी निवेदनातून दिला आहे.