नाल्यातील उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:35 AM2021-01-03T04:35:46+5:302021-01-03T04:35:46+5:30

गडचिरोली : कॉम्प्लेक्स परिसरातील नाल्यांचा उपसा करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. कॉम्प्लेक्स परिसर विस्ताराने फार मोठा ...

Uplift in the nala | नाल्यातील उपसा

नाल्यातील उपसा

googlenewsNext

गडचिरोली : कॉम्प्लेक्स परिसरातील नाल्यांचा उपसा करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. कॉम्प्लेक्स परिसर विस्ताराने फार मोठा आहे. त्यामुळे या ठिकाणी जादा मजूर लावण्याची आवश्यकता आहे. विसापूर भागातही नाली स्वच्छतेचे काम करण्याची आवश्यक आहे.

एकेरी वाहतुकीबाबत हालचाली नाहीत

गडचिरोली : गडचिरोली शहरातील मुख्य बाजारपेठ त्रिमूर्ती चौकातून आठवडी बाजाराकडे जाणाऱ्या मार्गावर आहे. सणासुदीच्या कालावधीत व आठवडी बाजाराच्या दिवशी रविवारी या मार्गावर वाहनधारकांची प्रचंड गर्दी असते. अनेकदा वाहतुकीची कोंडी होते.

वाहनांच्या गतीला आवर घाला

सिरोंचा : येथील प्रमुख मार्गांवर भरधाव वाहनांमुळे पहाटेच्या वेळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना अपघाताचा धोका होऊ शकतो. त्यामुळे वळण मार्गावर गतिरोधक लावून वाहनांच्या गतीला आवर घालण्यात यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

रांगी गावालगत गतिरोधक निर्माण करा

रांगी : येथील बसथांब्यापासून मोहलीकडे जाणाऱ्या मार्गावर गतिरोधक उभारणे आवश्यक आहे. गतिरोधक नसल्याने वाहने भरधाव वेगाने हाकली जातात. या मार्गावर अपघाताची शक्यता बळावली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

आरमोरी मार्गावरील अनेक पथदिवे बंद

गडचिरोली : आरमोरी मार्गावरील अनेक पथदिवे बंद पडले आहेत. हे पथदिवे सुरू करणे आवश्यक आहे. मात्र, नगरपरिषदेचे कर्मचारी याकडे दुर्लक्ष करतात. आरमोरी मार्गावर अनेक नागरिक पहाटे व रात्री जेवण झाल्यानंतर फिरण्यासाठी जातात. त्यामुळे या मार्गावरील पथदिवे दुरुस्त करणे आवश्यक आहे. याकडे नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

अहेरी आगाराला नव्या बसगाड्या द्या

अहेरी : अहेरी हे राज्यातील सर्वांत जुने एसटी आगार आहे. येथून लांब पल्ल्याच्याही अनेक गाड्या जातात. मात्र, बहुतांश गाड्या जुनाट आहे. त्यामुळे वारंवार नादुरुस्त होत आहे. येथून आंतरराज्यीय बससेवाही चालविली जाते. गडचिरोली व अहेरी आगाराला नव्या मोजक्या बसेसगाड्या काही महिन्यांपूर्वी उपलब्ध करून देण्यात आल्या; मात्र त्या अपुऱ्या आहेत.

कुलभट्टी-बोधनखेडा रस्त्याची दुर्दशा

धानोरा : तालुक्यातील कुलभट्टी-बोधनखेडा या कच्च्या मार्गाची पूर्णत: दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना व पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. कुलभट्टी ते बोधनखेडा हे सात कि.मी.चे अंतर असून, या मार्गावर गिट्टी पूर्णत: उखडली आहे. हा मार्ग जि.प.च्या बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतो. या मार्गावर दोन नाले असून, त्यावर पुलाचा अभाव आहे. नाल्यावर पूल बनविणे आवश्यक आहे.

एटापल्लीतील कार्यालये भाड्याच्या खोलीत

एटापल्ली : तालुक्यातील बहुतांश तलाठी कार्यालयाचा कारभार अद्यापही भाड्याच्या खोलीतूनच चालविला जात आहे. तलाठी हे महसूल विभागाचे अत्यंत महत्त्वाचे खाते आहे. तरीही तलाठी कार्यालयांना स्वत:च्या इमारती नाही. त्यामुळे कौलारू घरात जुने दस्तावेज ठेवले जात आहे. हे दस्तावेज खराब होण्याची शक्यता आहे.

अवैध ले-आऊटचा गोरखधंदा जोरात

देसाईगंज : देसाईगंज शहरात अनेक भूमाफीयांच्या माध्यमातून सरकारी जमिनीवर प्लॉट पाडून अवैधरीत्या कब्जा करून हा प्लॉट विक्री करण्याचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, याकडे नगर परिषद, नगर विकास व जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने लक्ष घालून कारवाई करावी.

रोजगारासाठी युवक कर्जाच्या प्रतीक्षेत

अहेरी : राज्यस्तरीय नोकरभरतीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील युवकांच्या नोकऱ्या हिरावून घेतल्या जात आहेत. त्यामुळे येथील युवकांना स्वयंरोजगार करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी बेरोजगार युवकांकडून होत आहे.

Web Title: Uplift in the nala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.