उद्योग उभारणीसाठी पैशापेक्षा इच्छाशक्ती महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 11:44 PM2017-11-12T23:44:38+5:302017-11-12T23:44:48+5:30

बहूतांश बेरोजगार उद्योग उभारण्यासाठी पैसा नसल्याची सबब पुढे करतात मात्र उद्योग उभारण्यासाठी पैशापेक्षा संबंधित व्यक्तीची इच्छाशक्ती महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन विदर्भ इन्डस्ट्रीज असोसीएशनचे सहसचिव गिरीधर गांधी यांनी केले.

Urgency matters more than money for building industry | उद्योग उभारणीसाठी पैशापेक्षा इच्छाशक्ती महत्त्वाची

उद्योग उभारणीसाठी पैशापेक्षा इच्छाशक्ती महत्त्वाची

Next
ठळक मुद्देगिरीधर गांधी यांचे प्रतिपादन : जिल्हा बिझनेस समिट कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : बहूतांश बेरोजगार उद्योग उभारण्यासाठी पैसा नसल्याची सबब पुढे करतात मात्र उद्योग उभारण्यासाठी पैशापेक्षा संबंधित व्यक्तीची इच्छाशक्ती महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन विदर्भ इन्डस्ट्रीज असोसीएशनचे सहसचिव गिरीधर गांधी यांनी केले.
गडचिरोली येथील गोंडवन कला दालन येथे रविवारी गडचिरोली जिल्हा बिझनेस समिटचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून खासदार अशोक नेते, जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर, आमदार डॉ. देवराव होळी, चंद्रपूरचे मधुसूधन रूंगटा, गडचिरोली जिल्हा उद्योग केंद्राचे महाप्रबंधक पाटील, उद्योग निती फाऊंडेशन चंद्रपूरचे संस्थापक अविनाश टीपरे, आरसेटीचे समन्वयक काटकर, एव्हीजी गोट फार्मच्या अरूणा म्हरस्कोल्हे, प्रदीप लाड, चंद्रपूरचे नितीन चनकरवार, बँक आॅफ इंडियाचे व्यवस्थापक जाटव, नगर परिषदेचे उपाध्यक्ष अनील कुनघाडकर, चामोर्शी पंचायत समितीचे सभापती आनंद भांडेकर, नगरसेवक प्रमोद पिपरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रविंद्र ओल्लालवार आदी मान्यवर उपस्थित होेते.
पुढे मार्गदर्शन करताना गिरीधर गांधी म्हणाले गडचिरोली जिल्ह्यात उद्योग उभारण्यासाठी अतीशय चांगले वातावरण व संधी उपलब्ध आहेत. या ठिकाणी असलेल्या जंगलावर आधारित अनेक उद्योग स्थापन करता येतात. येथील वनौषधी जगप्रसिद्ध आहे. सदर वनौषधी स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून गोळा करून ती देशातील नामांकित कंपन्यांना विकता येते. या वनौषधीवर प्राथमिक प्रक्रिया करणारे उद्योग गडचिरोली जिल्ह्यात उभारल्यास स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होईल. बँकांकडे मोठ्या प्रमाणात पैसा उपलब्ध आहे. सदर पैसा बँकांना कर्जातच गुंतवावा लागतो. त्यामुळे त्या ग्राहकांच्या शोधात आहेत. नागरिकांचा पैसा बँकेत पडून राहिल्याने बँकांना आपल्या ग्राहकांना व्याज भरून द्यावे लागत आहे. या संधीचा फायदा नवीन उद्योजकांनी उचलावा. नवीन व्यवसाय करू इच्छीनाºया व्यक्तीला विदर्भ इन्डस्ट्रीज असोसीएशन मार्गदर्शन करण्यासाठी नेहमी तयार असल्याचे प्रतिपादन केले.
खासदार अशोक नेते यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले केंद्र व राज्यातील सरकारने उद्योगांना चालना देण्याचे धोरण अवलंबीले आहे. त्यामुळे उद्योगामध्ये चैतण्याचे वातावरण निर्माण झाले आहे. उद्योगांना चालना देण्यासाठीच शासनाने मुद्रा योजना सुरू केली आहे. नागरिकांना स्वत:चा उद्योग व व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत होत आहे. असे मार्गदर्शन केले.
जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर यांनी मार्गदर्शन करताना अशा प्रकारचे मार्गदर्शन कार्यक्रम दर महिन्यातून किमान एकदा आयोजित करावे असे मार्गदर्शन केले आहे.
उद्योजकांच्या समस्यांचे समाधान
या कार्यक्रमादरम्यान उद्योग स्थापन इच्छिणाºया नागरिकांकडून अर्ज भरून मागण्यात आले. कार्यक्रमानंतर उपस्थित नागरिकांनी मार्गदर्शनकर्त्यांना प्रश्न विचारून शंकांचे निरसन केले. १०० दिवसांत १०० उद्योग स्थापन करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

Web Title: Urgency matters more than money for building industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.