उरी घटनेतील शहीद जवानांना जिल्ह्यात आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2016 02:36 AM2016-09-28T02:36:05+5:302016-09-28T02:36:05+5:30
जम्मू-काश्मिर राज्यातील उरी येथील घटनेत शहीद झालेल्या जवानांना विविध सामाजिक संघटनांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
विविध सामाजिक संघटनांचा सहभाग : उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या शोक संवेदना
गडचिरोली : जम्मू-काश्मिर राज्यातील उरी येथील घटनेत शहीद झालेल्या जवानांना विविध सामाजिक संघटनांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
फुले- आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, गडचिरोली - फुले- आंबेडकर महाविद्यालयातील एमएसडब्ल्यू भाग २ गट क्रमांक २ च्या विद्यार्थ्यांच्या वतीने उरी घटनेत शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सदर कार्यक्रम प्रा. गोर्लावार यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका मठ्ठे उपस्थित होते. यशस्वीतेसाठी समाजकार्य महाविद्यालयाच्या प्रशिक्षणार्थी भावना लांजेवार, अरविंद निकुरे, वैष्णवी वर्धेवार, ज्योती निंदेकर, प्रियंका कांबळे, आलोक गेडाम, सोनल रामटेके, सुनील चुधरी, वैभव कोटांगले उपस्थित होते.
आदिवासी परधान समाज मंडळ गडचिरोली - उरी घटनेतील शहीद जवानांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी प्रदीप मडावी, संजय मेश्राम, राजू कोडापे, नरेंद्र शेडमाके, चरणदास शेडमाके, सुरेंद्र शेडमाके, रतीराम पेंदोर, मुकुंदा मेश्राम, भाऊराव कोडापे, अरविंद कोडापे, प्रशांत कन्नाके, साईश कोडापे, योगेश कोडापे, आकाश कुळमेथे, मीनाताई कोडापे, भारती कोडापे, मुक्ता येरमे, जितेंद्र चांदेकर, रवी गेडाम, सचिन मरस्कोल्हे, राकेश कुळमेथे, गीता कुळमेथे आदी उपस्थित होते.
ग्राम पंचायत कार्यालय, घोट - येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सामुहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी घोटचे सरपंच विनय बारसागडे, उपसरपंच साईनाथ नेवारे, पंचायत समिती उपसभापती मंदा दुधबावरे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण लायबर, जिल्हा परिषद महात्मा गांधी हायस्कूलचे मुख्याध्यापक विनय चव्हाण, मनोज नागोसे, पोलीस उपनिरीक्षक जगदाडे, विलास गण्यारपवार, बबन धोडरे, बाबुराव भोवरे, गौतम खोब्रागडे, हेमंत दुधबावरे यांच्यासह घोट येथील नागरिक, शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उरी येथील घटना पाकिस्तान सरकारचेच कारस्थान आहे. त्यामुळे पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी भारताने सज्ज झाले पाहिजे. पाकिस्तानला धडा शिकविल्याशिवाय त्याच्या कुरघोड्या थांबणार नाही, असे प्रतिपादन कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी केले. (नगर प्रतिनिधी)