चाकलपेठ येथे बोरू या हिरवळी खताचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:36 AM2021-07-29T04:36:08+5:302021-07-29T04:36:08+5:30
यामध्ये चाकलपेठ येथील शेतकरी नरेश पाल, केशव रायसिडाम, बाबुराव पोहरकर, रमेश चुधरी, शालिक खेडेकर, यादव पाल, दलारसिंग बहिर आदी ...
यामध्ये चाकलपेठ येथील शेतकरी नरेश पाल, केशव रायसिडाम, बाबुराव पोहरकर, रमेश चुधरी, शालिक खेडेकर, यादव पाल, दलारसिंग बहिर आदी उपस्थित होते. या पिकांची पहिल्या पावसानंतर पेरणी करावी. ५५ ते ६० किलो बियाण्याचा वापर प्रती हेक्टरी करावा. बोरू हे पीक ४० ते ५० दिवसात फुलोऱ्यावर येते, तेव्हा त्या पिकाला जमिनीत गाडून घ्यावे. मातीत ते कुजवून ५० ते ६० किलो नत्राची स्थिरीकरण करतात व काही प्रमाणात बाकी पोषक द्रव्य पिकास उपलब्ध करून देतात. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. टी. सुरजे, कार्यकारी प्रभारी के.डी गहाणे, उपप्रभारी तुषार भांडारकर, आशिष वाढई, उषा गजभिये, छबिल दुधबळे, रुपेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.