दिवाळीमध्ये फटाक्यांचा वापर पर्यावरणपूरक पद्धतीने करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 08:37 PM2020-10-26T20:37:40+5:302020-10-26T20:38:06+5:30

Diwali Gadchiroli News दिवाळी किंवा इतर सणासुदीच्या कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी फटाक्यांचा वापर पर्यावरणपूरक पद्धतीने करावा व ध्वनी व वायू प्रदूषणावर आळा घालावा असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केल आहे.

Use firecrackers in an environmentally friendly manner during Diwali | दिवाळीमध्ये फटाक्यांचा वापर पर्यावरणपूरक पद्धतीने करा

दिवाळीमध्ये फटाक्यांचा वापर पर्यावरणपूरक पद्धतीने करा

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : फटाक्यांच्या वापरामुळे वायू प्रदुषण होऊन त्यातून विषारी वायूचे उर्त्सजन होते. त्यामुळे सदर बाबीस आळा घालण्याकरीता सुणासुदीच्या दरम्यान करावयाच्या उपाययोजनबाबत न्यायालयाने मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या आहेत. याबाबत जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दिवाळी किंवा इतर सणासुदीच्या कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी फटाक्यांचा वापर पर्यावरणपूरक पद्धतीने करावा व ध्वनी व वायू प्रदूषणावर आळा घालावा असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केली आहे. कमी धूर उर्त्सजन करणारे फटाके व पर्यावरण पूरक फटाक्यांची निर्मिती व विक्री अनुज्ञेय राहणार आहे. फटाक्यांची माळ किंवा एकत्रीत फटाके यांच्या निर्मिती, विक्री व वापरास भरपूर प्रमाणात वायू, ध्वनी घनकचऱ्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने त्यावर बंदी घालण्यात आली आहे.

फटाक्याची विक्री ही केवळ परवाना धारकास अनुज्ञेय राहिल व त्यांना केवळ परवाना प्राप्तच फटाक्यांची विक्री करता येणार आहे. ऑनलाईन संकेतस्थळावरुन फटाक्यांची विक्री करता येणार नाही. असे आढळून आल्यास तो सर्वोच्च न्यायालयाचा अवमान समजण्यात येणार आहे व तो द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र राहील. फटाक्यामध्ये बेरीयम साल्टचा वापर अनुज्ञेय राहणार नाही. ज्या फटाक्याची निर्मिती यापूर्वी करण्यात आलेली आहे व जी सदर शर्ती पुर्ण करु शकत नाही त्यांना परवानगी असणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस अधिकारी यांनी दिवाळी व इतर धार्मिक कार्यक्रम, विवाह कार्यक्रम इत्यादी मध्ये होत असलेल्या फटाक्यांचा वापर खरेदी, विक्री व ताब्याबाबत तपासणी करावी व उपरोक्त नमुद निदेर्शांचे उल्लंघन होत असल्यास फटाका परवाना रद्द करण्याबाबत त्वरीत निदर्शनास आणून द्यावे असे सूचित करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शंक सूचना संपूर्ण जिल्ह्यास पोलीस प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था व सर्व तहसिलदार यांनी त्यांचे स्तरावर काटेकोरपणे पालन करावे, असे जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.

Web Title: Use firecrackers in an environmentally friendly manner during Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.