पोलिसांच्या वाहतुकीसाठी वाढला हेलिकॉप्टरचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:15 AM2018-05-24T00:15:24+5:302018-05-24T00:15:24+5:30

नक्षलविरोधी अभियान राबविणाऱ्या पथकातील पोलिसांना गडचिरोलीत आणण्यासाठी आता रस्ता मार्गाऐवजी हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे. गेल्या महिन्यातील नक्षलविरोधी मोहिमानंतरची परिस्थिती पाहता पोलीस विभाग जवानांच्या सुरक्षिततेसंबंधी कोणतीही जोखीम पत्करण्यास तयार नसल्याचे दिसून येते.

Use of helicopter for police transport increased | पोलिसांच्या वाहतुकीसाठी वाढला हेलिकॉप्टरचा वापर

पोलिसांच्या वाहतुकीसाठी वाढला हेलिकॉप्टरचा वापर

Next
ठळक मुद्देसुरक्षित वाहतूक : जोखीम पत्करण्यास नकार

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नक्षलविरोधी अभियान राबविणाऱ्या पथकातील पोलिसांना गडचिरोलीत आणण्यासाठी आता रस्ता मार्गाऐवजी हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे. गेल्या महिन्यातील नक्षलविरोधी मोहिमानंतरची परिस्थिती पाहता पोलीस विभाग जवानांच्या सुरक्षिततेसंबंधी कोणतीही जोखीम पत्करण्यास तयार नसल्याचे दिसून येते.
जिल्हा पोलीस दलाच्या सेवेत असलेल्या हेलिकॉप्टरचा वापर नक्षलविरोधी अभियानादरम्यान जखमी झालेल्या जवानांना तातडीने उपाचारासाठी हलविण्यास केला जातो. याशिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दौऱ्यासाठी, निवडणुकांच्या काळात जवान आणि निवडणुकीच्या कामातील कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांवर पोहोचविण्यासाठी केला जातो. मात्र आता सी-६० पथकातील जवान किंवा अधिकाऱ्यांना सुटीवर जायचे असेल तरी गडचिरोलीपर्यंत सुरक्षित पोहोचविण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे.
उन्हाळी सुट्यांमुळे अनेक जण कौटुंबिक कार्यक्रम, पर्यटन यासाठी सुटीवर जात आहेत. आतापर्यंत ते आपल्या सोयीने गावाकडे जात होते. पण सध्या नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल ग्रामीण भागातून गडचिरोलीपर्यंत रस्त्याच्या मार्गे येणे त्यांच्यासाठी धोक्याचे ठरू शकत असल्याचा अंदाज आल्याने त्यांना गडचिरोलीपर्यंत हेलिकॉप्टरने आणले जाते. त्यामुळे सध्या हेलिकॉप्टरच्या घिरट्या अनेक ठिकाणी वाढल्याचे दिसून येते. जवानांना सतर्क राहण्याचे निर्देश आहेत.

Web Title: Use of helicopter for police transport increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस