तणनाशकांच्या वापराने जमिनीचा पाेत बिघडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:13 AM2021-08-02T04:13:33+5:302021-08-02T04:13:33+5:30
काही वर्षांपूर्वी शेतकरी शेती व्यवसायासोबतच गाय, बैल, म्हैस, शेळ्या, मेंढ्या आदी जनावरे पाळत होते. जनावरांची विष्ठा शेणखत म्हणून शेतीसाठी ...
काही वर्षांपूर्वी शेतकरी शेती व्यवसायासोबतच गाय, बैल, म्हैस, शेळ्या, मेंढ्या आदी जनावरे पाळत होते. जनावरांची विष्ठा शेणखत म्हणून शेतीसाठी उपयोगी पडत होती. शेणखतातून शेतीला मोठ्या प्रमाणावर पोषक तत्त्वे मिळत होती. या तत्त्वांमुळे शेतीला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचत नव्हती. शिवाय शेतीचा पोत वाढत होता. सोबतच पूर्णपणे निरोगी पिकांपासून शेतकऱ्यांना भाजीपाला व इतरही पिके घेता येत होती. उत्पन्नाचा दर्जा चांगला राहत होता. त्यामुळे पौष्टिक अन्न मिळण्यास मदत व्हायची; परंतु आता परिस्थिती बदलली आहे. पूर्वी खरीप आणि रब्बी पिकांवर कोणत्याही रोगाचे आक्रमण झाले तरी, शेतकरी स्वतः उपाययोजना करीत होता; परंतु कालांतराने ही पद्धत मोडीत निघाली. आता कोणत्याही गावात हे चित्र दिसत नाही. पीक चांगले राहण्याकरिता रासायनिक खतांचा भरमसाट वापर केला जात आहे. परिणामी जमिनीतील आवश्यक पोषक तत्त्वे नष्ट होत आहेत.