दारू गाळण्यासाठी गुळाचा वापर; पावणेदोन लाखांचा सडवा नष्ट

By गेापाल लाजुरकर | Published: June 10, 2023 02:21 PM2023-06-10T14:21:52+5:302023-06-10T14:24:52+5:30

बामणी पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूची कारवाई

Use of jaggery for distilling alcohol; 1.75 lakh worth rotten jaggery destroyed | दारू गाळण्यासाठी गुळाचा वापर; पावणेदोन लाखांचा सडवा नष्ट

दारू गाळण्यासाठी गुळाचा वापर; पावणेदोन लाखांचा सडवा नष्ट

googlenewsNext

गडचिरोली : जिल्ह्यात मोहफूल, गूळ व साखरेपासून हातभट्टीवर अवैधरित्या दारू गाळली जाते. छुप्या मार्गाने हा व्यवसाय केला जातो. यातच सिरोंचा तालुक्यात जुन्या गुळापासून मोठ्या प्रमाणात दारू गाळली जात आहे. तालुक्यातील गर्कापेठा येथे गुळाचा सडवा टाकला असल्याच्या माहितीवरून उपपोलिस स्टेशन बामणी व मुक्तिपथ चमुने शुक्रवारी थाड टाकून १ लाख ८० हजार ५०० रुपये किमतीचा गुळाचा सडवा नष्ट केला.

गर्कापेठा येथे नव्याने दारू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या अलिकडेच वाढली. त्यांना पोलिसांनी वारंवार सूचना दिली. तरीसुद्धा काही विक्रेते चोरट्या मार्गाने दारूविक्री करीत होते. अशातच हातभट्टी लावून दारू गाळण्यासाठी विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात गुळाचा सडवा टाकला असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पोलिस पथक व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या कारवाई करीत दारू विक्रेत्यांचा १ लाख ८० हजार ५०० रुपयांचा १८ ड्रम गुळाचा सडवा व साहित्य नष्ट केले. ही कारवाई प्रभारी अधिकारी मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पारधी, पोलिस कर्मचारी व मुक्तिपथ तालुका चमूने केली.

Web Title: Use of jaggery for distilling alcohol; 1.75 lakh worth rotten jaggery destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.