उत्पादनवाढीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 01:33 AM2018-11-18T01:33:01+5:302018-11-18T01:34:02+5:30

महागाई व उत्पादन खर्च वाढल्याने शेती दिवसेंदिवस तोट्यात जात आहे. शेतीत अधिकाधिक उत्पादन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरण, सूक्ष्म सिंचनाचा वापर करावा, असे आवाहन कृषी तज्ज्ञांनी केले.

Use technology to grow production | उत्पादनवाढीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करा

उत्पादनवाढीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करा

Next
ठळक मुद्देकृषी तंज्ज्ञांचे आवाहन : कासवी येथे कृषी कल्याण अभियानांतर्गत जाणीव-जागृती कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : महागाई व उत्पादन खर्च वाढल्याने शेती दिवसेंदिवस तोट्यात जात आहे. शेतीत अधिकाधिक उत्पादन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरण, सूक्ष्म सिंचनाचा वापर करावा, असे आवाहन कृषी तज्ज्ञांनी केले.
कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग, आत्मा आणि पशुसंवर्धन विभागाअंतर्गत २ आॅक्टोबर २५ डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यातील २५ गावात कृषी कल्याण अभियान-२ राबविले जात आहे. याअंतर्गत शेतकºयांमध्ये जाणीव-जागृती निर्माण करण्याकरिता तालुक्यातील कासवी येथे शेतकरी प्रशिक्षण राबविण्यात आले. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषतज्ज्ञ (कृषी अभियांत्रिकी) ज्ञानेश्वर ताथोड, विषय विशेषतज्ज्ञ (पीक संरक्षण) पुष्पक बोथीकर, विषय विशेषतज्ज्ञ (पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र) डॉ.विक्रम कदम, पशुविकास अधिकारी डॉ.यू.एल.कारने, कृषी सहायक डी.के.क्षिरसागर, कृषी पर्यवेक्षक ए.आर.हुकरे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व्ही.डी.रहांगडाले, ग्रा.पं.सदस्य शेषराव कुमरे, पोलीस पाटील बाळकृष्ण सडमाके, वामन मरस्कोल्हे उपस्थित होते.
डॉ.विक्रम कदम यांनी पशुसंवर्धन, कुकुटपालन ही काळाची गरज आहे. शेतकºयांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून पुरक व्यवसाय करावा, दुग्ध व्यवसाय करण्यासाठी दुधाळ गायींना चारा म्हणून नेपीअर फुले, जयवंत चारा पिकाची लागवड करावी, जनावरांचे लसीकरण करून कृत्रिम रेतनाद्वारे दुधाळ गायींची जोपासणा करावी, असे आवाहन केले. ज्ञानेश्वर ताथोड यांनी यांत्रिकीकरण, सूक्ष्म सिंचन, कृषी प्रक्रिया उद्योग याविषयी मार्गदर्शन केले.
पुष्पक बोथीकर यांनी मशरूम, मधमाशीपालन व्यवसाय करण्याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ.यू.एल.कारने, डी.के.क्षिरसागर यांनीही मार्गदर्शन केले. प्रशिक्षणादरम्यान कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभागामार्फत प्राथिनिधिक स्वरूपात कृषीनिविष्ठांचे वाटप करण्यात आले.

Web Title: Use technology to grow production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.